Home मुंबई श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईहून...

श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईहून ते पंढरपुरकडे पायी प्रस्थान माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥ !! जय जय राम कृष्ण हरि !!

36

मुंबई प्रतिनीधी: महेश कदम

‘मुंबई ते पंढरपुर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४’ या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईकडून पंढरपुरकडे प्रस्थान होत असताना सालाबाद प्रमाणे या वर्षीही शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना कार्यालयाच्या आवारात आगमन झाले. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ही परमेश्वर सेवे प्रमाणेच असते. म्हणूनच या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी बंधु-भगिनींचे आदरतिथ्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे श्री. मयुर कांबळे म्हणतात. वै. डॉ. चंद्रकांत कांबळे (आबा) यांनी सुरु केलेली प्रथा त्यांच्या पश्चात सुपुत्र मयुर कांबळे राबवित असल्याने दिंडी चालक समिती अध्यक्ष ह. भ. प. नारायण पाटील महाराज यांनी त्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. वारकरी बांधवांचा पंढरपुर पर्यंतचा प्रवास सुकर व्हावा या उद्देशाने छत्री, मोबाईल पाऊच, खाद्यसामग्री, प्रवासात सोयीची बॅग इ. वस्तुंचे वाटप केले. या प्रसंगी अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांच्यासह देवेंद्र कांबळे, स्वामी जावळे, मोहम्मद हुसैन, सफी शेख, भटू अहिरे, विनोद सातपुते, गणेश झिंजू्र्डे, दिंडी चालक समिती अध्यक्ष ह. भ. प. नारायण पाटील महाराज, सचिव-ह. भ. प. चंद्रकांत कारंडे, छ्बूबाई पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते, बहुसंख्य वारकरी बांधव उपस्थित होते.

Previous articleआत्म कथाकार: दी स्टोरी ऑफ माय लाइफ! [डॉ.हेलन केलर पुण्यस्मरण विशेष]
Next articleना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्तांना मिळाले सहा महिन्यांचे घरभाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here