बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून उद्या २ जून ला निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली. मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीची लेखी परीक्षा गुरुवार २ मार्च २०२३ ते शनिवार, दिनांक २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा होती. ती अखेर संपली आहे.
असा पहा निकाल :
वेबासाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोल नंबर किंवा आईचे नाव टाकून दहावीच्या बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी ज्या वेबसाईट देण्यात आल्या आहेत, त्यातून निकाल डाऊनलोड करू घेता येणार आहे. यामध्ये या विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी दिली असणार आहे.