Home महाराष्ट्र सत्यशोधक विधिकर्ते म्हणून मामानेच भाच्याचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने घ्यावा...

सत्यशोधक विधिकर्ते म्हणून मामानेच भाच्याचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने घ्यावा – सत्यशोधक ढोक फुले एज्युकेशन तर्फे मोफत 44 वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला.

59

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे अहील्याराणी होळकर यांची जयंती आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन शताब्दी सुवर्ण महोसत्वी वर्षानिमित्त मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी दु..१ वा. सूर्यचंद्र सांस्कृतिक भवन ,गिरझणी, अकलुज येथे सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा भाचा सत्यशोधक अक्षय सुनील खिलारे, अकलुज आणि सत्याशोधिका प्रतिका प्रकाश एकतपुरे, माळवाडी या पदवीधर वधू वरांचा मोफत ४४ वा . सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला. संस्थेतर्फे हा पहिलाच अकलुज परिसरातील सत्यशोधक विवाह विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी रजिस्टर नोंदणी करून, वर मामा म्हणून प्रथमच सत्यशोधक विवाह विधी कार्ये पार पाडले.
या प्रसंगी प्रा.डॉ.राजाराम ढोक आणि समाजसेवक संजय सोनटक्के यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात आली. तसेच आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र पाहुण्याचे हस्ते दिले गेले. यावेळी अक्षता म्हणून नेहमीप्रमाणे फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आल्या तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन देखील सत्यशोधक ढोक यांनीच गायिली.

याप्रसंगी आयोजक सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी प्रतिपादन केले की महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात म्हंटले आहे की विवाह विधी कोणाही मध्यस्थी शिवाय आपण पण लावू शकतो त्याला भटजीची गरज नाही.त्याप्रमाणे माझ्या कुटुंबातील हा विवाह भटजी विरहित महात्मा फुले याना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने
लावला आहे.हाच आदर्श आपण सर्वांनी घेऊन या विज्ञान युगात अंधश्रध्दा , कर्मकांड ,पंचांग आणि मुहुर्थ याला तिलांजली द्यावी. महापुर्षांचे विचाराने मानवताधर्म एकच समजून या पुढे सर्व कार्य पाडावीत.पुढे ढोक म्हणाले की लोकमाता अहील्याराणी रूपाने मला प्रतिका कन्या मिळाली तसे आपण सर्वांनी मुलगी सून नसून कन्या माना तिला अजूनही शिक्षण हवे असेल तर शिकवा . एक मुलगी शिकली तर अक्के कुटुंब साक्षर करून आपले घर देखील स्थिर करू शकते.
कार्यक्रमाचे सुरवातीला वधू वर यांचे शुभहस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला तर अक्षय आणि प्रतिका यांनी वैवाहिक जीवनाविषयी शपथ घेतली. तर मोलाची मदत अक्षय मित्र परिवार आणि आकाश – क्षितिज ढोक यांनी केले तर मामी सत्यशोधीका आशा ढोक यांनी सत्याचा अखंड गाऊन या सोहळ्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.यावेळी हजारोंचे संख्येने लोक उपस्थित असल्याने मंडपात या सत्यशोधक विवाहाची चर्चा रंगली होती आणि हीच पद्धत चांगली ,असेच लग्न व्हायला हवेत असे प्रत्यक्ष भेटून अनेकांनी रघुनाथ ढोक यांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here