



रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपूरी(दि. 30 मे ):-
दिनांक 29 मे 2023 रोज सोमवारला सकाळी 10 वा. चिचखेडा येथील स्मशानभूमीत शेड बांधकाम व तारेचे संरक्षण कुंपण हे बांधकाम जन सुविधा अंतर्गत मंजूर रू. 15 लाख निधी बांधकामाचे भूमिपूजन अतुलभाऊंच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच लोकेश चौके ग्रामपंचायत सदस्य पार्वता मानकर, देवानंद ठाकरे धनराज मांदळे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य तथा विलास जांबुडे पोलीस पाटील,यशवंत मानकर, महादेवजी ननावरे , मने ग्रामसेवक इ. मान्यवर तसेच चिचखेडा येथील बहुसंख्य तरूण युवक जनता जनार्दन उपस्थित होती
या भूमिपूजनाला तालुक्याचे भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे सर, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी सौ.वंदनाताई शेंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती रामलाल दोनाडकर, महामंत्री भाजयुमो तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपूरी प्रा.यशवंत आंबोरकर, द्यानेश्वर दिवटे महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी तालुका, राजेश्वर मगरे तालुकाध्यक्ष आदिवासी आघाडी ब्रह्मपुरी तालुका,अनील तिजारे सरपंच ,रेवती ठाकूर सरपंच,लोमेश ठाकूर इ.मान्यवर उपस्थित होते.
भुमीपुजनानंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना अतुलभाऊ म्हणाले की, स्मशानभूमीचा विकास हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतो, मात्र हे काम जिल्हा परिषद च्या माध्यमातून होऊ न शकल्यामुळे ते काम जन सुविधा अंतर्गत व्हावा असा आग्रह मी स्वतः सुधीर भाऊंकडे धरला. आणि सुधीर भाऊंनी देखील आपल्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत हे काम मंजूर केले. त्यामुळे मी सुधीरभाऊंचे मनापासून आभार मानतो.एवढेच नव्हे तर चिचखेडा वासियांनी गावासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही विकास कामासाठी मला अवगत करावे मी गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असेल असा मोठा विश्वास देखील या ठिकाणी जनतेसमोर जाहीर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन आणि आभार प्रा.रामलाल दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका तथा माजी सभापती यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कमिटी तथा ग्रामसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.


