



✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड:- (दि.27 मे) गेल्या अनेक वर्षापासुन जंगल भागातील लोकांना वनअधिकार मिळावा त्यासाठी ग्रामीण भागातील नागरीकांना बऱ्याच पायपिट,येरझार्यां कराव्या लागत होत्या त्यांना हक्काचे वन अधिकार मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या.
परंतु उमरखेड मतदार संघाचे सर्वसामान्यांची जाण असणारे आमदार नामदेव ससाने यांनी नंतर उमरखेड तालुक्यातील सात गावांना दावे मंजुर करुन कायमचा सामूदायिक वनहक्क दाव्याचा प्रश्न निकाली काढला.
अनुसुचीत जमाती व इतर परंपरागत वननिवासी कायदा 2006 व नियम 2008 सुधारित अधिनियम 2012 अंतर्गत उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील सामुहीक वनहक्क दावे दाखल करण्यात आले होते. या वनहक्क दावा मंजुरी करीता आमदार नामदेव ससाने यांनी सतत पाठपुरा करुन जिल्हास्तरीय समिती यवतमाळ कडुन दावे मंजुर करुन आणलेत.त्याचीच फलश्रुती म्हणून आज उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील जेवली या तेंदूपत्ता फडीवर आज आमदार ससाने यांनी भेट दिली तेंव्हा त्यांचे वन हक्क समिती व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले आमदार ससाने यांनी वन हक्क मिळवून दिल्यामुळे या भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे.
जे शेकडो मजूर स्थलांतर करत होते ते आज थांबले असून मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्द झाला आहे त्यामुळे मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे हे सर्व शक्य आमदार ससाने यांच्यामुळे झाले आहे.
अशी प्रतिक्रिया महिला मजुरांकडून देण्यात आली मग मजुरांना मजुरी सुद्धा दर तिसऱ्या दिवशी आर डी पटेल कंपनी वर्धा यांचे मॅनेजर गायकवाड यांच्या हस्ते सर्व मजुरांना अदा करण्यात येत आहे. या भागातील सर्व जनतेला तेंदू पत्याबाबत सर्व माहिती अवगत करून गायकवाड यांनी दिलेली आहे.
या भागातील पूर्ण तेंदू पत्त्याचा जे टारगेट आहे ते 2000 टन आहे व यामधून जवळपास पंधराशे ते सोळाशे स्टॅंडर्ड नक्कीच निघेल अशी अशा व्यक्त केलेली आहे या सर्व कामात जंगल विकास समितीने फार मोलाचे काम केलेले आहे. या सर्व कामामुळे मजूर खुश असून भविष्यात असाच रोजगार बंदी भागातील जनतेला मिळत राहो हीच इच्छा व्यक्त केली आहे.
या वनहक्क दाव्यामुळे गावकर्यांना जंगल व वन्य प्राण्याचे संरक्षण व संवर्धन करण्याचे अधिकार,जंगलाचे व्यावस्थापन करण्याचा व त्याबद्दल नियम बनविण्याचा हक्क,चराई चा हक्क ई.अनेक अधिकार मिळाले आहेत.
चौकट– ” कायम दुर्लक्षीत असलेल्या बंदी भागातील माय माऊलीच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहुन खुप समाधान वाटले, बंदीभागाच्या विकासा करीता मी सदैव कटिबद्ध राहीन.”
— आमदार नामदेव ससाने


