



प्रतिनिधी – प्रमोद पाटील
चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे या गावात डेंग्यू – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धुराळणी गावाचे सरपंच दगडू गणपत पाटील, उपसरपंच गोरख आत्माराम पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.
आपले गाव स्वच्छ सुंदर गाव रहावे. कुठल्याही नागरिकांना कुठल्याही डास मच्छरांपासून डेंग्यु – मलेरीया सारखे भयानक आजार होऊ नये. यासाठी संपूर्ण गावात डेंग्यू – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धुराळणी आरोग्य सेवक संदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक चौका- चौकात, गल्लीमध्ये फवारणी करण्यात आली. फवारणी केल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले व कुणीही डेंग्यू व मलेरीया आजाराला बळी पडणार नाही या उद्देशाने ही फवारणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लांडे सर, मेडिकल ऑफिसर गायकवाड सर, भोसले सर, मलेरिया सुपरवायझर, बी.पी.राठोड, आरोग्य सहाय्यक शितोळे नाना, निकम नाना, सी एच ओ रामटेके मॅडम, एम पी डब्ल्यू संदिप चौधरी, वुएके, हेमंत पवार, गुरुदास पाटील, केदार भस्मे, विकास सोनवणे, लॅब टेक्निशियन विजय पगारे, ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आशा सेविका व आरोग्य सेविका ठाकूर मॅडम, कर्मचारी रघुनाथ महाजन, योगेश महाजन, गावातील वृद्ध कर्मचारी मंडळी यांनी धुराळणी व फवारणी करण्यास सहकार्य केले.


