Home चंद्रपूर चंदनखेडा येथे विभागीय गटप्रमुख शेतकरी प्रशिक्षण संपन्न

चंदनखेडा येथे विभागीय गटप्रमुख शेतकरी प्रशिक्षण संपन्न

25

 

(भद्रावती)- उत्तम कापुस उत्पादित करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान समजून घेण्याचे दृष्टिकोनातून भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे वतीने विभागीय गटप्रमुख शेतकरी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन चंदनखेडा ग्राम पंचायतचे सरपंच नयन जांभुळे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी विभागीय समन्वयक संगीता मुलकुलवार नागपुर, कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा रंदये वरोरा, पर्यावरण मित्र संस्थेचे शंकर भरडे, कृषी पर्यवेक्षक व्हि.बी.कवाडे, प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर भिवधरे, जेंडर समन्वयक वैशाली मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रशिक्षणात उत्तम कापुस लागवडीसाठी करावयाची तयारी, माती निर्मिती प्रक्रिया व जमीनीचे आरोग्य, पाणी व्यवस्थापन, हिरवळीच्या खताचे महत्व व त्याची निर्मिती, जैविक खते व जैविक कीटकनाशके, गळ फांद्या व फळ फांद्याची ओळख, वातावरणातील बदल व शेतपिकांवर होणारा परिणाम, उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे विविध पर्याय, औषधी वनस्पती व फळबाग लागवड, महिला सक्षमीकरण व स्रि-पुरुष समानता यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात भद्रावती, वरोरा व चिमुर तालुक्यातील गटप्रमुख शेतकरी यांचा सहभाग होता. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा रंदये, संचालन प्रक्षेत्र अधिकारी दशरथ रामटेके तर आभारप्रदर्शन प्रक्षेत्र अधिकारी वैशाली श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे सर्व प्रक्षेत्र अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleभिसी – जांभुळघाट मार्गावर असलेल्या पारडपार फाट्यावर अवैधरित्या ट्रक ची सील तोडून दगडी कोळशाची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू दगडी कोळशाचा साठा हा गोकुल खदानीचाच मायनिंग अधिकारी व पोलीस प्रशासन झोपेत
Next articleअतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करता का हो तहसीलदार साहेब ! शेतकऱ्यांची तळमळीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here