Home महाराष्ट्र स्व. गणपतराव देशमुख यांना पोलिस मित्र संघटनेच्या वतीने अभिवादन

स्व. गणपतराव देशमुख यांना पोलिस मित्र संघटनेच्या वतीने अभिवादन

35

नागेश खुपसे-पाटील,(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी)मो. 77750 96293 सोलापूर-

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते व सांगोला विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.भाई गणपतराव देशमुख यांना पोलिस मित्र संघटनेच्या वतीने सांगोला येथील निवासस्थानी अभिवादन करण्यात आले.*पोलिस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भाऊ भगत यांच्या हस्ते स्व.देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन (भाऊ) भगत यांनी स्व. आमदार गणपतराव देशमुख साहेब यांच्या सांगोला येथे निवासस्थानी नातू शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली.सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले.
प्रारंभी बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन (भाऊ) भगत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन (भाऊ)भगत, सोलापूर जिल्हा जनसंपर्क प्रकाश (दादा) चौगुले, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीमती विजयाताई करणवर, जिल्हा सचिव जिवराज गुंड पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष रावसाहेब चौगुले, सांगोला तालुका विधानसभा अध्यक्ष अरुण वाघमोडे गुरुजी, तालुकाध्यक्ष सौ. शालनताई चौगुले, सांगोला तालुका जनसंपर्क प्रमुख श्रीमती जयश्री सावंत, सांगोला तालुका सचिव सौ. सत्यभामा गडहिरे, सांगोला तालुका उपाध्यक्ष मा. बाळकृष्ण वाघमारे, सांगोला तालुका शहराध्यक्ष पांडुरंग गायकवाड, सांगोला तालुका कार्याध्यक्ष सौ. रेखा दत्ता साळवे, कमिटी सदस्य धनराज दत्ता साळवे, कमिटी सदस्य सौ. सुवर्णा मिलिंद वाघमारे, कमिटी सदस्य सौ. रिजवाना मुलाणी, कमिटी सदस्य पुनम बनसोडे, कमिटी सदस्य सौ. दिपाली देशमुख, कमिटी सदस्य आण्णासाहेब तात्यासाहेब चौगुले, युवा नेते बाबासाहेब गाडे,फलटण तालुका निरीक्षक राकेश कदम, फलटण तालुका कमिटी सदस्य माऊली वाणी आदीसह पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकारी वर्गाला राष्ट्रीय संपर्क गजानन (भाऊ) भगत व सोलापूर जिल्हाध्यक्षा विजया ताई करणवर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन (भाऊ) भगत यांनी पोलीस मित्र संघटनेचया पदाधिकारी यांना संघटना वाढीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले.

Previous articleदेशाभिमान, क्रांती अन् हौतातम्याचे चरीत्रनाट्य : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके हे नाटक’
Next articleवन नेशन, वन इनॉगरेशन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here