
(भद्रावती)- शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी व उच्च शिक्षण घेण्यासाठी सोयीस्कर मार्ग मिळाला या दृष्टीकोनातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे लगत असलेल्या सरस्वती विद्यालय मुधोली येथे निसर्गमय वातावरणात दिनांक ४ ते ६ जुन या कालावधीत जिल्हा स्तरीय तीन दिवसीय निवासी स्वरुपातील प्रयास शिबिराचे आयोजन केले आहे.
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व पर्याय, व्यक्तीमत्व विकास, अभ्यास तंत्र, १० व १२ वी नंतर विविध शिक्षणाचे पर्याय, स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय व व्यवसाईक दृष्टीकोन यासारख्या महत्वाचे विषयावर तज्ञ व्यक्तींकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या शिबिरात सहभागी होण्याचे दृष्टीकोनातून आपली नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील तालुका किंवा स्थानिक शाखेतील अध्यक्ष/सचिव यांचेकडे संपर्क करुन आपली नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा शाखा अध्यक्ष नंदकिशोर जांभुळे यांनी केले आहे.
