Home लेख आर्टिकल -७९

आर्टिकल -७९

124

 

भारतीय संविधानात प्रकरण दुसरे यामध्ये संसद विषयी माहिती देण्यात आली आहे .त्यातील आर्टिकल ७९ मध्ये म्हटले आहे की,” संघराज्यकरिता एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी अशी दोन सभागृहे मिळून ती बनलेली असेल . त्याचप्रमाणे आर्टिकल ५३(१)मध्ये असे म्हटले आहे की ,”संघराज्याची शासन शक्ती राष्ट्रपतीच्या ठायी निहित असेल आणि त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत या संविधानानुसार तिचा वापर केला जाईल.
आर्टिकल- ७९ मध्ये प्रधानमंत्री या नावाचा उल्लेख केला नाही. कारण देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असल्याने देशाच्या संविधानाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असते .

आज नवे संसद भवन निर्माण झाले आहे .येत्या २८ मे ला त्या भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्रीच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे देशात राजकीय कलह पाहायला मिळत आहे. प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नेता असला तरी तो सर्व भारताचा प्रधानमंत्री असतो. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्ष प्रोटोकॉल समजून न घेता भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कारभार करायला हवा. नव्या संसदेचे उद्घाटन करण्याचा संविधानिक अधिकार फक्त आणि फक्त भारतीय राष्ट्रपतीलाच आहे. लोकसभेच्या सभापतीलाही नाही. काही पक्ष जाणूनबुजून लोकांना गुमराह करत आहेत.
आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे .त्यामुळे एकतंत्री राजेशाही देशात चालू शकणार नाही. देशातील प्रधानमंत्र्याची भूमिका ही संदिग्ध तशीच असंविधानिक असल्याचे निर्देशनात येते .त्याचप्रमाणे २८ मे तारखेला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यापेक्षा २६ नोव्हेंबरला संविधान दिवसाला जर उद्घाटन केले असते तर तो एक महत्त्वाचा दिवस ठरला असता. पण प्रधानमंत्र्याच्या पक्षाच्या छुपा अजेंडा असल्याकारणाने २८ मे ही तारीख घेतली असावी असे लोकांना वाटते.

देश प्रगतीपथावर जात आहे. असे वक्तव्य करून अनेक देशांच्या टाळ्या घेतल्या. तरी भारतातील सामाजिक , आर्थिक , धार्मिक वातावरण प्रदूषित होत आहे .नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाने ते आणखी प्रदूषित झाले आहे. देशापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ ठरत आहे. आज अनेक अंधभक्त त्यांना खरा देशसेवक म्हणत आहेत. जर प्रधानमंत्री खरे देशसेवक असते तर त्यांनी राष्ट्रपतीच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले असते .पण तसे होणार नाही. शेवटी बिरादरी आडवी आलीस असे म्हणावे लागेल. तसेच नवीन संसद भवनामध्ये होत असलेले होम हवन मंत्र तंत्र हे एक धार्मिक अनुष्ठान आहे .त्यामुळे भारतीय संविधानाची पायमल्ली केली जात आहे .नव्या संसद भवनामध्ये होत असलेले होम हवन मंत्र तंत्र हा एक राष्ट्रद्रोह आहे. आपण कितीही श्रेष्ठत्वाच्या गोष्टी केल्या तरी आपण खरे संविधानवादी होऊ शकत नाही. कारण आपल्या मनामध्ये असलेले पूर्वग्रह आपल्याला ते करू देत नाही. म्हणून येणारा काळ तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संविधानातील आर्टिकल -७९ हेच भारतीय संसद भवनाची खरी ताकद आहे. येणाऱ्या काळात भारतीय जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार यात शंका नाही.

संदीप गायकवाड नागपूर
९६३७३५७४००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here