Home गडचिरोली केंद्र शासनाविरोधात कोरची तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निषेध आंदोलन

केंद्र शासनाविरोधात कोरची तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निषेध आंदोलन

80

 

कोरची – वसीम शेख, तालुका प्रतिनिधी मो. 94049 25488

कोरची- देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती पदाच्या अपमान करून उद्घाटन करीत आहेत हा संविधानाचा, महिलांचा तसेच दलित व आदिवासी समाजाचा अपमान आहे. याचे निषेध म्हणून कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरची येथील मुख्य चौकात निषेध आंदोलन करण्यात आला यावेळी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष राजेश नैताम, परमेश्वर लोहंबरे, नगरसेवक धनराज मडावी, नगरसेवक धरमसाय नैताम, नगरसेवक दिलीप सरपंच, सरपंच बुधराम फुलकुवर, उपसरपंच सुरेश उईके, गोपाल मोहुर्ले, हमीद खान पठाण, खेदुराम किरीभोईर, अरुण मोहुर्ले, रूखमन घाटघुमर, तबरेज जाडीया, सरजुराम जमकातन, प्रेम काटेंगे, बाबूलाल शेंडे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here