Home मुंबई सीवूडस केशवकुंज टोलेजंगी इमारत धोकादायक(?) (डॉ. माकणीकर यांचा आंदोलनाचा इशारा.)

सीवूडस केशवकुंज टोलेजंगी इमारत धोकादायक(?) (डॉ. माकणीकर यांचा आंदोलनाचा इशारा.)

43

 

मुंबई दि (प्रतिनिधी) सीवूडस केशवकुंज, सेक्टर-44 ए, भूखंड क्रमांक 5 ते 9, 23 मजली इमारत धोकादायक स्थितीत असून प्रशासन जाणीवपूर्वक कळाडोळा करत आहे, कारवाई नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा आरपीआय (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. असून माकणीकर यांनी दिला आहे.

इमारत बांधकामास वापरात आलेले स्टील मटेरियल झिजुन गेले आहे. या ठिकाणी ऑल रेडी मजूर कार्यरत असल्यामुळे सडलेल्या ठिकाणचे सिमेंट काम पडले असता त्या ठिकाणी ही लोक तात्पुते सिमेंट लावून ती जागा भरून काढतात. जेणेकरून सडलेले स्टील कुणाच्या निदर्शनात येऊ नयेत.

सदर बाबी नगर विकास विभागाला ज्ञात असून सुद्धा विकासकाला जाणीवपूर्वक मागे घातले जात असल्याचा आरोप डॉ. माकणीकर यांनी केला आहे.

ही इमारत भविष्यात ढासाळून जीवितहानी होऊ शकते. या गोष्टी नाकारता येणार नाहीत.
कारण इमारतीचे बांधकाम अत्यंत निस्कृष्ठ दर्जाचे आहे. उद्या जीवित हानी टाळता येणार नाही. कारण या इमारती मध्ये असंख्य परिवार वास्तव्यास आहेत.

या इमारतीचे लवकरात ऑडिट स्ट्रॅक्चर ऑडिट करावे निकृष्ठ बांधकाम प्रकरणी विकासकावर कारवाई करावी. कर्तव्यात कसूर सम्बन्धित आधीकार्या वर सुद्धा तात्काल कार्यवाही व्हावी.

लवकरात लवकर असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षा च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्याची सुरुवात आमरण उपोषणाद्वारे केली जाईल असा इशारा डॉ. माकणीकर यांनी नगर विकास मंत्रालय व राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथरावं शिंदे यांना दिला आहे.

Previous articleगंगाखेड शुगरला ४,३७,१७८ रूपये देण्याचे कोर्टाचे आदेश-धनादेश अनादर प्रकरण
Next articleकेंद्र शासनाविरोधात कोरची तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निषेध आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here