



✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 26 मे) उमरखेड शहर व तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे व महामारी कोरोनाच्या काळामध्ये गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किटचे वाटप करणारे, गाढे अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव लोमटे सर व त्यांच्या पत्नी सौ.कल्पनाताई लोमटे यांच्या आज मंगल परिणय दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहाराला भेट देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच बुद्ध विहाराच्या विकास कामाकरिता लोमटे परिवार करून पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली.
पंधरा हजार रुपयांचे पॉकेट रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका), प्रफुल दिवेकर (अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती) आणि पत्रकार सिद्धार्थ दिवेकर (कोषाध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती)
यांच्या हातामध्ये देऊन
आपला 22 वा मंगल परिणय दिन आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा केला.
यावेळी त्यांच्या सोबत त्यांची आई जिजाबाई लोमटे, बहीण, मेव्हूणे, भाची इत्यादी नातेवाईक उपस्थित होते.
यामधून “समाजातील इतर लोकांनी असा आदर्श घेतला पाहिजे की, आपल्या आनंदाच्या वेळेस आपल्या संपत्तीतून समाजाचं देणं म्हणून समाजाला आर्थिक सहकार्य करून समाज घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे”…! अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ दिवेकर यांनी दिली.
यावेळी प्रफुल दिवेकर, हिराबाई दिवेकर,जिजाबाई दिवेकर यशोदाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, जिजाबाई. स. दिवेकर, तुषार पाईकराव, सिध्दार्थ दिवेकर, शुद्धोधन दिवेकर,तानेज पाईकराव इत्यादि अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


