
अहमदनगर – औरंगाबाद येथील रमाई साहित्य चळवळीच्या वतीने दहावे रमाई साहित्य संमेलन अहमदनगर येथे शनिवार दि.२७ मे २०२३ रोजी श्रीरामपूर येथील प्रसिद्ध कवयित्री व लेखिका दिशा पिंकी शेख यांच्या अध्यक्षतेखाली होत असून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रतिमा परदेशी या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत,अशी माहिती स्वागताध्यक्ष ललिता खडसे व प्रा.डॉ. रेखा मेश्राम यांनी दिली.
अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी नऊ वाजता डॉ.उषा अंभोरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी ॲड. सुभाष लांडे पाटील,जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,मनपा आयुक्त पंकज जावळे, संदीप खडसे, हर्षद शेख, भीमराव बनसोड, नीलिमा बंडेलू, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण, तरवडीचे उत्तमराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत असून उद्घाटन समारंभात पुस्तक प्रकाशन होणार आहे.बारा वाजता वंचिताची दिशा व दुपारी अडीच वा.तृतीयपंथी आणि सामाजिक मानसिकता हक्क व अधिकार या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी चार वाजता रमाई गौरव पुरस्कार वितरण होणार असून यावेळी आंबेडकरी विचारवंत ज.वि. पवार उपस्थित राहणार आहेत.दुपारी चार वाजता ठरावाचे वाचन होणारं आहे.सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध कवयित्री शर्मिला गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन होणार असून या काव्य संमेलना मध्ये स्वाती ठूबे,कल्पना वाहूल, दत्ता इंगळे, रत्नकला बनसोड, शीला जाधव, सुनंदा नागदिवे, सुनिता इंगळे, माया दामोदर, ऋता ठाकूर,स्वाती काळे, स्वाती अहिरे,पुनम राऊत, विद्या भडके,संगीता रसाळ, सुरेखा कांबळे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक कवयित्री सहभागी होणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता या संमेलनाचा समारोप होणार असून त्यानंतर सात वाजता विद्रोही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दैवशीला गवांदे, बेबीनंदा पवार यांनी केले आहे.
