Home महाराष्ट्र गोंडवाना विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर प्राध्यापक कुणाल गायकवाड यांची निवड

गोंडवाना विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर प्राध्यापक कुणाल गायकवाड यांची निवड

37

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा.डॉ.कुणाल डी.गायकवाड यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सौ स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
डॉ. कुणाल डी.गायकवाड हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत.
त्यांच्या गोंडवाना विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्तीबद्दल इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रा.डॉ.एल. चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here