Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयाच्या ‘शरभंग’ नियतकालिकास विद्यापीठस्तरीय नियतकालिक स्पर्धेत ०५ पारितोषिके प्राप्त

चोपडा महाविद्यालयाच्या ‘शरभंग’ नियतकालिकास विद्यापीठस्तरीय नियतकालिक स्पर्धेत ०५ पारितोषिके प्राप्त

27

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘शरभंग २०२१-२२’ या वार्षिक नियतकालिक अंकास एकूण पाच पारितोषिके जाहीर झाली आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच लेखन कार्यास व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘विद्यापीठस्तरीय वार्षिक नियतकालिक अंक स्पर्धेचे’ आयोजन केले जाते. या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील महाविद्यालयाकडून वार्षिक नियतकालिक अंक मागविले जातात. या स्पर्धेत एक विविध साहित्य प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके दिली जातात. चोपडा महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी सुधाकर पाटील या विद्यार्थिनीने कष्टकरी शेतकरी या विषयावर आधारित मुखपृष्ठ चित्र काढले असून ‘शरभंग’ या वार्षिक नियतकालिक अंकाच्या मुखपृष्ठाला ‘उत्कृष्ट मुखपृष्ठ’ प्रथम क्रमांकाचे (रु.५०००/- व प्रमाणपत्र) पारितोषिक प्राप्त झाले असून सदर विद्यार्थिनीने ‘युवारंग २०२२-२३’ मध्ये घेण्यात आलेल्या ‘व्यंगचित्र’ कलाप्रकारात कांस्यपदक मिळविले आहे. या विद्यार्थिनीला युवारंग प्रमुख डॉ.एच.जी.चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. ‘उत्कृष्ट मांडणीचे’ तृतीय क्रमांकाचे (रु.३०००/- व प्रमाणपत्र) पारितोषिक ‘शरभंग’ या नियतकालिक अंकास जाहीर झाले आहे. या स्पर्धेत ‘उत्कृष्ट मराठी कविता’ प्रकारात कीर्ती राजेंद्र नेवे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांकाचे (रु.७५०/- व प्रमाणपत्र) पारितोषिक प्राप्त केले. उत्कृष्ट इंग्रजी वैचारिक लेख या साहित्य लेखन प्रकारात प्रियंका डी.पावरा हिने लिहिलेल्या ‘Defeat your Depression’ या लेखाला प्रथम क्रमांकाचे (रु.१०००/- व प्रमाणपत्र) पारितोषिक प्राप्त झाले आहे तसेच उत्कृष्ट हिंदी संशोधन लेख या लेखन प्रकारात पाटील माधुरी वासुदेव हिने लिहिलेल्या ‘वर्तमान पत्रकारिता के बदलते आयाम’ या लेखास प्रथम क्रमांकाचे (रु.१०००/- व प्रमाणपत्र) पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेत एकूण पाच पारितोषिके प्राप्त करून चोपडा महाविद्यालयातील ‘शरभंग’ नियतकालिकाने चमकदार कामगिरी केली आहे. या ‘नियतकालिक अंक स्पर्धेत’ नियतकालिक अंक संपादक मंडळ तसेच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शरभंग संपादक मंडळ सल्लागार डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, महाविद्यालय समन्वयक डॉ.एस.ए.वाघ व रजिस्ट्रार डी.एम.पाटील यांनी सर्व यशस्वी चित्रकार विद्यार्थी, लेखक, कवी, संशोधक विद्यार्थी तसेच संपादक डॉ.एम.एल.भुसारे, संपादक मंडळ सदस्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ.के.एस.भावसार, डी.एस.पाटील, ए.एच.साळुंखे, एस.बी.पाटील, एस.आर.पाटील व मार्गदर्शक प्राध्यापक बंधू-भगिनी या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Previous articleवरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाची नवीन कार्यकारिणी गठित अध्यक्षपदी राजेंद्र मर्दाने , सचिवपदी जितेंद्र चोरडिया
Next articleजगी नारींना प्रेरणादायी: माता रमाई! (माता रमाई आंबेडकर निर्वाण दिन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here