



उपक्षम रामटेके,(सह संपादक, मो.98909 40507)
चंद्रपूर- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्याकरिता शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची समस्या निवारण सभा आयोजित करण्यात आली होती . सभेत अनेक विषयावर साधक बाधक चर्चा करून १० जूनपर्यंत समस्या निकाली काढण्याचे निर्देश माननीय आमदार यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे यांना दिले आहे. समस्या निवारण सभेला जे अधिकारी अनुपस्थित होते त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे निर्देश सुद्धा दिले . नुकत्याच पार पडलेल्या कर्मवीर मा .सा. कन्नमवार सभागृहातील समस्या निवारण सभेत अनेक संघटना पदाधिकारी उपस्थित असून त्यांच्या उपस्थितीमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची पदोन्नती येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन माननीय शिक्षणाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासाडे यांनी दिले. चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांना वेतनश्रेणी चालू ठेवून भविष्यात कोणतेही अतिप्रधान वसुली करण्यात येणार नाही; सन 2022 -23 प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करून प्राथमिक शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करण्यात येईल , त्यासाठी १९९० ते १९९३ पर्यंतच्या सर्व शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील ; आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना अवघड शाळेत पदस्थापना देण्यात येईल ; सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा व तिसरा हप्ता निधी प्राप्त होतात अदा करणे ; डीसीपीएस आणि एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना प्राण नंबर देणे व त्यांच्या एनपीएस पावत्या वितरणाची सद्यस्थिती व शिक्षकांच्या जीपीएफ पावत्या वितरणाची सद्यस्थिती ; शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा घेणे ; प्राथमिक विभागातून उच्च प्राथमिक विभागात निम्न श्रेणी शिक्षकांचे समायोजन झाले असते त्यांना माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी मिळण्याबाबत ; प्रलंबित वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे ; शैक्षणिक पात्रता वाढवण्याचे अधिकार पंचायत समिती स्तरावर देण्याबाबत पत्र काढण्याचे शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले . प्रलंबित वैद्यकीय देयकेबाबत निधी प्राप्त होतात सर्व प्रकरणे जेष्ठता क्रमानुसार निकाली काढण्याचे शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले .पदवीधर शिक्षकाचे वरिष्ठ श्रेणी वेतन निश्चिती पडताळणीसाठी पाठवलेल्या सेवा पुस्तकाची त्वरित पडताळणी करून पंचायत समितीला पाठविणे ; भविष्य निर्वाह निधी परतावा प्रलंबित प्रकरणाबाबत निधी प्राप्त होता निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले .शैक्षणिक पात्रता प्रस्ताव प्रलंबित असून ते तात्काळ निकाली काढणे ; सेवानिवृत्ती प्रकरण तात्काळ निकाली काढून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना जीपीएफ व अंशराशीकरण तात्काळ द्यावे ; खाजगी अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे जिल्हा परिषद आस्थापनेत समायोजन झाले त्या शिक्षकांचे वेतन पथक अधीक्षक यांचे कार्यालयातून एनपीएस रक्कम जिल्हा परिषद आस्थापनेत ट्रान्सफर करण्यात यावे ; शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिक्षकांचे व मदतनिसांचे थकीत मानधन तात्काळ काढण्यात यावे ; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती अशा विविध विषयांवर चर्चा करून दिलेल्या मुदतीत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले .
यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्यनेते विजय भोगेकर , राज्यसरचिटणीस हरीश ससनकर , जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , सरचिटणीस सुरेश गिलोरकर , जिल्हानेते नारायण कांबळे , सल्लागार दीपक वऱ्हेकर , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे , कोष्याध्यक्ष सुनील कोहपरे , उपाध्यक्ष सुभाष अडवे , जीवन भोयर , रवी सोयाम , किशोर येनगटीवार , जगदीश ठाकरे , विलास मोरे , अतुल तिवाडे , नितीन बमनवार , सिन्नदेव गेडाम , लक्ष्मण खोब्रागडे आदी शिलेदार उपस्थित होते .
—————————————-
निवेदनातील सर्व प्रकरणे ज्या अधिकाऱ्यांमुळे प्रलंबित राहिली त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाला १०जूनपर्यंत मुदत दिली असून ,दिलेल्या मुदतीत समस्या निकाली न निघाल्यास माझ्या पद्धतीने पुढील कार्यवाही करून शिक्षकांना न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य आहे .
*सुधाकर अडबाले*
शिक्षक आमदार , विधानपरिषद
—————————————-
जिल्हा परिषद अंतर्गत कामाच्या बाबतीत होणारी दिरंगाई प्राथमिक शिक्षकांसाठी डोकेदुखीचा विषय असताना सभेत शिक्षक आमदार यांनी प्रशासनाला धारेवर धरून दिलेली समज शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यास गती देईल . यासाठी आमची संघटना लढाऊ बाण्याने सदैव शिक्षकांच्या सोबत असून , यापुढेही अधिक जोमाने पाठपुरावा करीत राहील .
*विजय भोगेकर*
राज्यनेते, म.पूरो. शिक्षक संघटना
—————————————-


