Home गडचिरोली बोगस बियाणे विक्रीला पायबंद घालावा- आमदार देवेंद्र भुयार

बोगस बियाणे विक्रीला पायबंद घालावा- आमदार देवेंद्र भुयार

58

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
पीकाची उत्पादकता वाढण्यासाठी शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच मोर्शी वरूड तालुक्यात कुठेही बोगस बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता कृषि विभागाने घ्यावी. असे निर्देश मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले.
मोर्शी येथील तहसील सभागृहात खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस तहसीलदार सागर ढवळे, तालुका कृषि अधिकारी साजना इंगले, गट विकास अधिकारी उज्वला ढोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम सुकर होण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीं मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे. शेतकरी बांधवांना आवश्यक असणारे खरीप पीककर्ज वेळेत वितरीत करण्यात यावे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता बॅकांनी घ्यावी. ज्या बँका पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करतील त्यांचेवर गुन्हे दाखल करावे. जिल्ह्यातील पीक लागवड लक्षात घेऊन आवश्यक ते बी-बियाणे, खते व कृषि निविष्ठा मुबलक उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. बी-बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे व खते विक्री होणार नाही. यासाठी कृषि विभागाने खते व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मार्गदर्शन करावे. शिवाय शेतकऱ्यांच्या लाभाच्या विविध योजना शासन राबवित आहेत. या योजनांची माहिती शेतकऱ्यांना द्यावि. मोर्शी वरूड तालुक्यात फळबाग संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्यात.

शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कृषि निविष्ठा देण्यात यावी. बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक अथवा लिंकिंगचे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेऊन, जादा दराने बियाणे, खत विक्री अथवा शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह लिंकिंगचे प्रकार घडतील, त्या संबंधित अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आमदार देवेंद्र भुयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here