



✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड :- (दि. 25 मे) येथील नामवंत वैद्यकीय अधिकारी,गोर गरीबांसाठी देवदूत समजले जाणारे डॉ.हनुमंत धर्मकारे यांची एका वर्षापूर्वी गोळ्या घालून निर्घृण हत्त्या करण्यात आली.
या कृत्याचा निषेध आणि आरोपींना फाशीची सजा व्हावी यांसह अनेक महत्वपूर्ण मागण्यांसाठी काल दि.24/05/2023 रोजी उमरखेड तहसिल कार्यालयावर लहुजी क्रांती मोर्चा द्वारे जिवंत माणसांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या पत्नी, डॉ.रश्मीताई हनुमंत धर्मकारे यांनी प्रशासनाच्या निराशाजनक कार्यवाही वर बोट ठेवत आरोपींना पाठीशी घालणाऱ्या तमाम गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.आणि माझ्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे.
अशी भावनिक आर्त साद दिली.त्यांच्या भाषणा वेळी वातावरण अतिशय भावनिक होऊन उपस्थितांचे अश्रू अनावर झाले होते.
या मोर्चात लहुजी क्रांती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष प्रा.विकास पाथरिकर यांनी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच या हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेऊन जे जे प्रशासकीय अधिकारी या संदर्भात निराशाजनक आणि संशयास्पद भूमिका घेत आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी तसेच डॉ.धर्मकारे यांची केस जलदगती न्यायालयात वर्ग करून ती नांदेड येथे चालवावी.अशी मागणी केली.
लहुजी क्रांती मोर्चा चे राज्य कार्याध्यक्ष नितीन कांबळे यांनी मनुवादी व्यवस्थेला धारेवर धरत, प्रशासकीय यंत्रणा 15 दिवसांचा कालावधी देत जर प्रशासन कुचकामी ठरल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी लहुजी क्रांती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष संजय बनसोडे बहुजनांचे लोकप्रतिनिधी हे पक्षाचे हस्तक झाले असून समाजाने लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच संविधानिक लढाई लढण्यासाठी मैदानात उतरले पाहिजे असे आव्हान केले.
डॉ .धर्मकारे साहेबांची केस जलद गती न्यायालयात चालविण्यात यावी,
डॉ.धर्माकारे यांच्या पत्नी डॉ.रश्मी हनुमंत धर्माकारे यांना स्पेशल केस म्हणून क्लास टु ची नोकरी प्रदान करावी.
ह्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडे द्यावा. डॉ. धर्मकारे यांच्या कुटुंबियांना 50 लाख नुकसान भरपाई देण्यात यावी.
अनुसूचित जाती जमाती यांचे सर्व खटले हे जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत.
यांसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यासाठी हा मोर्चा तहसिल कार्यालयावरती धडकला.
सदर मोर्चा चे निवेदन सुपूर्द करताना प्रशासनाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या विरोधात मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पायरीवरचा ठीय्या मांडला.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी बाहेर असल्याचे कारण सांगून, मोर्चा कऱ्यानी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तब्बल एक तासाने उपस्थिती दर्शवत निवेदन स्वीकारले.यावेळी वातावरण काहीशे गंभीर झाले होते.
यावेळी लहुजी क्रांती मोर्चा चे पुंडलिक तकवारे, संभाजी काळे, यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी वर्षाताई देवसरकर,भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे बहुजन क्रांती मोर्चा चे किशोर नगारे,लहुजी क्रांती मोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष भास्कर सूर्यवंशी,शुभम खंदारे,शिवाजी पारखे, भारत लांडगे,समाधान गवारे,माजी आमदार विजयराव खडसे साहेब,चव्हाण साहेब, किशोरदादा भवरे,राहुल गायकवाड,राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा चे शेख जब्बार,प्रकाश कांबळे, अमोल पाटील, भारतीय विद्यार्थी मोर्चा चे साहिल रोकडे,सुहास मनेश्र्वर,निखिल थोरात, विक्रम प्रेमिलवाड,अक्षय सूर्य,रवी राऊत, छत्रपती क्रांती सेनेचे प्रमोद जाधव पाटील, शिवाजी चंद्रवंशी,दिगंबर कदम,राजू भांडवले, सुदाम गायकवाड,नितीन ठोके,किशोर कांबळे,रमेश हिंगडे,पांडुरंग हींगडे,गणेश वाहुळे.
यांसह अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी हजारोंच्या संख्येने डॉ. धर्मकारे यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक घटकातील हजारोंच्या संख्येने जनसागर उसळला होता.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून,नाग चौक पासून सुरू झालेल्या ह्या आक्रोश मोर्चा ची सांगता, मुख्य चौकातून तहसिल कार्यालय येथे झाली.
प्रास्ताविक विनोद बनसोडे,आभार लोकेशजी कांबळे तर सुत्रसंचलन विद्वान केवटे यांनी केले.
डॉ.धर्मकारे अमर रहे यांसारख्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.सध्या सर्वत्र ह्या मोर्चाची चर्चा पहावयास मिळते आहे.


