Home चंद्रपूर नेवजाबाई हितकारणी विद्यालय नवेगाव पांडव येथील प्रत्येक वर्गखोली आता डिजिटल स्मार्ट वर्गखोली

नेवजाबाई हितकारणी विद्यालय नवेगाव पांडव येथील प्रत्येक वर्गखोली आता डिजिटल स्मार्ट वर्गखोली

52

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
नागभीड(दि. 22 मे ):-
नवीन शैक्षणिक सत्र 2023-24 पासून नेवजाबाई हितकारीनी विद्यालय नवेगाव पांडव येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शाळेचे आधुनिकीकरण व तांत्रिकीकरनाच्या माध्यमातून शिक्षण मिळाले पाहिजे या उदात्त भावनेने नेवाजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नेवजाबाई हितकारिणी विद्यालय नवेगाव पांडव येथे विद्यालयाची प्रत्येक वर्गखोली आता डिजिटल स्मार्ट रूम झालेली आहे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून नेवजाबाई हितकारिणी विद्यालय नवेगाव पांडव या सरकारी शाळेमध्ये प्रत्येक वर्ग खोलीमध्ये शिकवण्यात येणार आहे. कॉन्व्हेंटच्या दर्जाची शाळा निर्माण करण्याचा चंग अशोकजी भैया यांनी बांधला असून सरकारी शाळा सुध्दा दिल्ली पॅटर्न प्रमाणे होऊ शकतात हा दृष्टिकोन त्यांनी बाळगला आहे.
डिजिटल स्मार्ट रूम च्या माध्यमातून सरकारी शाळेत विद्यार्थ्याना शिक्षण मिळण्याची ही पहिलीच वेळ जिल्ह्यामध्ये असणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रकारे शिक्षकांना शिकवता यावं ही एक दूरदृष्टी ठेवून शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया तसेच सर्व शिक्षकांनी त्याच्या माध्यमातून काम हाती घेतलेले आहे.
त्यांच्या या शाळा सुधार कार्याचे पंचक्रोशीत आणि शिक्षणक्षेत्रात फार कौतुक होत आहे. संस्थेच्या वतीने नवेगाव पांडव येथे हॉस्टेल मोफत हॉस्टेल ची सुविधा करण्यात आली आहे.त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या आधुनिक शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन सुध्दा शाळेतील शिक्षक व संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleश्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
Next articleजागतिक कासव दिन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here