Home महाराष्ट्र श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित ...

श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

25

 

( प्रतिनिधी)

ठाणे – श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, लिखाणावर तसेच त्यांनी केलेल्या भाषणावर अभ्यास व्हावा, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग दर्शविला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सुमेध पारधे, कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी अँड प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि.गौतम बस्ते यांचे सहकार्य लाभले तसेच श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था उल्हासनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उल्हासनगर सर्व सभासद सहकारी ह्याचे ही मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेत एकूण 80 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पारितोषिक विजेते आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचे आयोजकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
ह्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक – शेख अल्यार शेख रज्जाक, बुलढाणा ( गट ब ) विषय- वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने आणि त्याचे समाधान व द्वितीय पारितोषिक (गट अ) – कोल्हापूर स्नेहल पंकज पाटील, विषय- लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर तर तृतीय पारितोषिक ( गट ब) – वाडा / ठाणे सीमा महाले – नविन शैक्षणिक धोरणाचे बहुजन समाजावर परिणाम यांना मिळाले असून प्रोत्साहन पारितोषिके संदिप गायकवाड – नागपूर ( गट ब ) वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व त्यांचे समाधान , प्रिया भोले – पुणे ( गट अ) लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, प्रणय प्रभा – नागपूर (गट ब ) विषय-वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व समाधान, पुर्वा कुलकर्णी – नाशिक ( गट अ ) विषय-लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, किर्ती होवळे – सांगली (गट अ) विषय -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या वृत्तपत्रांचा आढावा , अमित कांबळे – कल्याण ( गट ब) विषय- वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व त्यांचे समाधान,
स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच ह्या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा निकाल ऑनलाइन गुगलमीट द्वारे कार्यक्रम घेऊन जाहीर करण्यात आला. यावेळी कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी अँड प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि.गौतम बस्ते यांनी निकाला संदर्भात माहिती देऊन निबंध कसे असावेत, कसे नसावेत आणि निबंध कसे लिहावे याबाबद्दल उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

Previous articleआश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या लागणार मार्गी-आमदार सुधाकर अडबाले आदिवासी विकास विभागात समस्या निवारणार्थ सहविचार सभा
Next articleनेवजाबाई हितकारणी विद्यालय नवेगाव पांडव येथील प्रत्येक वर्गखोली आता डिजिटल स्मार्ट वर्गखोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here