संजय बागडे ९६८९८६५९५४
नागभिड: चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी कोरंबी या गावात दिनांक 14 मे 2023 रोजी नेचर-को आष्ट्रेलिया च्या श्रीमती मेलनी यांनी भेट दिली तर रीवार्ड्स नागभिड येथे विदर्भ उपजीविका मंच चे पदाधिकारी सोबत सभा संपन्न झाली.
या गाव भेटीत नेचर-को आष्ट्रेलियाचे आशिया प्रशांत विभागाचे व्यवस्थापक (प्रकल्प भागीदारी) चंद्रकांत देवकर, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूरचे कार्यकारी संचालक दिलीप गोडे, विदर्भ उपजीविका मंच चे संयोजक तथा ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ चे कार्यकारी संचालक डॉ. किशोर मोघे, अडव्होकेट पुर्णिमा उपाध्याय, खोज मेळघाट, इश्यू संस्था नागपूर चे संस्था प्रमुख राजीव थोरात, ग्राम आरोग्य संस्था घाटी (कुरखेडा) चे रुपचंद दखणे आणि रिवार्ड्स मल्टिपर्पज सोसायटी नागभिड चे गुणवंत वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध जिल्ह्यातील सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत प्रतिनिधी श्रीकांत लोडम, मनोली कळसकर, ललित भांडारकर, महादेव गिल्लुरकर, दीपक बावणे उमेश सहरे, भोजराज नवघडे, दिलीप नवघरे यांची उपस्थिती होती.
यावेळी कोरंबी गावात ग्रामसभेच्या वतीने नैसर्गिकपणे सजविलेल्या प्रवेश द्वारावर महिलांनी आरतीने ओवाळणी करून पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे आदरतिथ्य केले. पौराणिक वाद्या वर आदिवासी नृत्य सादरिकरण, रांगोळी, रस्त्यांची सजावट, रानभाज्या, मोहापासूनचे विविध उत्पादनांची प्रदर्षणी इत्यादी व्यवस्था गावकऱ्यांनी केली होती. ग्रामसभेच्या वतीने पळस पानाची टोपी व तेंदू पुडके देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती कोरंबी चे अध्यक्ष केशव जांभुळे यांनी ग्रामसभेला प्राप्त वनहक्काची अमलबजावणी आणि लोकसहभागाने झालेल्या विकास कामांची माहिती दिली. कोरंबी येथील ग्रामस्थांनी केलेली कामांची काहिती जाणून घेण्याचे हेतून आलेल्या पाहुण्यांनी लोकांशी चर्चा/संवाद करून कामांबाबत अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी चंद्रकांत देवकर यांनी कोरंबी गावातील विकास प्रक्रिया फार चांगली आहे असे मत व्यक्त केले. मेलणी यांनी कोरंबी येथील नैसर्गिक सौंदर्य चांगले आहे. विकासप्रती लोकात उत्साह व आत्मविश्वास खूप चांगला आहे असे प्रतिपादन केले.प पाहुण्यांनी परिसरातील निसर्गाची पाहणी केली. पाहुण्यांचे हस्ते ग्रामसभा कार्यालयाची बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संपूर्ण संचालन ग्रामसभा महासंघाचे अध्यक्ष कैलाश नन्नावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वास कुंभारे यांनी केले. या गाव भेटीचे यशस्वीतेसाठी संपूर्ण ग्रामस्थिनी परिश्रम घेतले. आलेल्या पाहुण्यांनी अवॉर्ड/रिवार्ड्स संस्थेला भेट दिली व त्यानंतर निसर्गायन येथे विदर्भ उपजीविका मंच चे पदाधिकारी सोबत मीटिंग संपन्न झाली.




