सहसंपादक//उपक्षम रामटेके
📱9890940507
चिमूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात विविध विभागातर्फे विकास कामे चालू आहेत, कुठे जलजीवन अंतर्गत पाणी पुरवठा, तर कुठे वाचनालय, माशानभूमीशेड, कांग्रेटीन(सिमेंट) रोड, ग्रामपंचायत इमारत,अंगणवाडी अश्या विविध इतर कामे चालू आहेत, अश्या कामाला रेतीचा वापर होतो, परंतु चिमूर तालुक्यामध्ये कुठेही रेती घाटाचे लिलाव नसताना या कामासाठी रेती येते तरी कुठून हा गंभीर प्रश्न आहे..
चिमूर तालुका हा नदीचा तालुका म्हणून ओळखला जातो, या तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात नदी आहेत, तिथं मुबलक रेती उपलब्ध आहे, त्याच नदी पात्रामधून संबंधित कंत्राकदार अवैध रेती उतखन्ननं करून आपले कामे करत आहेत ही वस्तू स्थिती आहे, काही गावामध्ये अवैध रेती उपसा एवढा मोठ्या प्रमाणात झाला आहे कि तेथील नदी पत्रामध्ये आता रेती नसून गवत उगवले आहे.
येत्या काळात चिमूर तालुक्यातील नदी मध्ये रेती राहणार नाही, त्यामुळे नदी मध्ये रेती नसल्यास पाणी पण राहणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवाना उन्हाळ्यात शेतामध्ये भाजीपाला पीक घेता येणार नाही या गंभीर समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
अवैध रेती तस्करीच्या तक्रारी दाखल करून सुद्धा या रेती तस्करावर कुठलेही कार्यवाही होत नाही त्यामुळे संबंधित अधिकारी हे कुंभकर्णी झोपेत आहेत असे म्हणाला काही वावग ठरणार नाही. कंत्राकदार व अवैध रेती उपासा करणाऱ्याना हे अधिकारी पाठीशी घालत आहेत हे तेवढेच सत्य आहे.
ज्या गावामध्ये अवैध रेती उपसा होत आहे, अश्या गावामध्ये अवैध रेती उपासा थांबवण्याचे काम हे सरपंच, पोलीस पाटिल आणि तलाठी यांचे असते, परंतु असे होताना दिसत नाही त्यामुळे सरकारने चिमूर तालुक्यातील गावांची प्रत्यक्ष चौकशी करून ज्या गावामध्ये अवैध उतखन्नन झाले आहे त्या गावामधील सरपंच आणि पोलीस पाटिल त्याच बरोबर तलाठी यांना निलंबित करण्यात यावे.
क्रांतीनगरीची ओळख असणाऱ्या चिमूर तालुक्याची वाटचाल आता अवैध उत्खनाची नगरी असा होत आहे त्यामुळे प्रशासनानी सुस्त न बसता अवैध रेती उत्खनन करणाऱ्यावर कार्यवाही करावी… पण करणार नाही तरी पण…?
(संबंधित रेती घाटा विषयी माहिती ही माहिती अधिकार मधून सह संपादक यांच्या कढे उपलब्ध)




