✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 10 मे) डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या सूर्याने आम्हा सर्वांना प्रकाशित करून भ .बुद्धाचा धम्म देऊन आपल्या देश्यावरच सर्वांवरच उपकार केल्याचे प्रतिपादन पि री पा चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केले ते मरसूळ बेलखेड फाट्यावर आयोजित तथागत बुद्ध यांच्या जयंती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोहनराव मोरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक आप्पासाहेब मैंद प्रो. डॉ.अनिल काळबांडे डॉ.श्याम दवणे, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर , डॉ . पी पी थोरात हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून पीरिपाचे कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, किसनराव वानखेडे , अंबादास धुळे ,आत्माराम हापसे ॲड.भारत बरडे, प्रा.अंबादास वानखेडे,लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर,वीरेंद्र खंदारे हे उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात आर्या सत्यरक्षिता यांनी पंचशील त्रिशरण देऊन धम्मदेशना दिली तर दुपारच्या सत्रात शेतकरी मार्गदर्शन सोहळ्यात डॉ. पी.पी थोरात यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सायंकाळच्या प्रबोधन सत्रात प्रा.कवाडे सर म्हणाले की, आमच्या श्वासावर आम्ही खात असलेल्या प्रत्येक घासावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. लहानपणापासून या देशात जातीयतेचे वर्णव्यवस्थेचे विष पेरल्या जात आहे.
अशा अवस्थेमध्ये देश जागतिक महासत्ता कसा होईल देशाला आपला विकास करायचा असेल जागतिक महासत्ता व्हायचा असेल तर भारताला बुद्धाच्या विचाराशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
सत्यशोधक सर सेनानी आप्पासाहेब मैंद यांनी बोलताना म्हणाले की, भगवान बुद्धाच्या विज्ञानवादी धम्माची सैद्धांतिक मांडणी करून खरा धर्म जोपर्यंत लोकांसमोर येणार नाही तोपर्यंत मानव सुखी होणार नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी प्रख्यात विचारवंत डॉ.अनिल काळबांडे यांनी, सुद्धा भगवान बुद्धाने या देशाला काय दिले आणि त्यांच्या विचारामुळे जगामध्ये बौद्ध धर्माचा कसा विकास होत आहे तेथील राष्ट्र कसे प्रगतिशील होत आहेत.
याबद्दल सविस्तर माहिती
सांस्कृतिक कार्यक्रमात ‘मी सावित्री बाई फुले बोलतेय सादरकर्ते वंदना वाघमारे यांनी सादर करून सावित्री जोतीरावांचा जिवनपट आपल्या अभिनयातून मांडला.
या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी आमदार विजयराव खडसे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन दामोदर यांनी केले तर आयोजन रिपब्लिकन मंचावतीने सिद्धार्थ बर्डे पंजाब नवसागरे गजानन दामोदर, अनिल धोंगडे, प्रवीण बरडे, सतीश कांबळे सह पदाधीकारी यांनी परिश्रम घेतले.




