Home महाराष्ट्र महात्मा दिनानिमित्त सरपंच जयश्री शिंदे यांचा डॉ.तुषार,महाराष्ट्र आणि पुजा,गुजरात यांचा फुले एज्युकेशन...

महात्मा दिनानिमित्त सरपंच जयश्री शिंदे यांचा डॉ.तुषार,महाराष्ट्र आणि पुजा,गुजरात यांचा फुले एज्युकेशन तर्फे होणार ४२वा.सत्यशोधक विवाह !!!

126

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

 

म्हसवड: फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जोतीराव फुले याना 11 मे 1888 रोजी महात्मा पदवी बहाल केली त्यास 11 मे 2023 ला 135 वर्ष पूर्ण होत आहे व सत्यशोधक समाज स्थापना दिन शतकोत्तर सुवर्ण महोसत्वी वर्षानिमित्त दि.१५ मे २०२३ रोजी दु.४.३० वा. सिताराम मल्टीपर्पज हॉल ,दिवड,म्हसवड येथे समाजसेवक डॉ .नानासो शिंदे यांचा मुलगा सत्यशोधक डॉ.तुषार शिंदे , एमबीबीएस, माण, सातारा आणि सत्याशोधिका पुजा भानुदास काळेल ,बी.फार्म,करेलीबाग,गुजरात या उच्चशिक्षित वधू वरांचा मोफत ४२ वा . सत्यशोधक सोहळा संपन्न होणार आहे. संस्थेतर्फे हा पहिलाच म्हसवड परिसरातील सत्यशोधक विवाह विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक रजिस्टर नोंदणी करून लावणार आहेत.

या प्रसंगी ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात येणार आहे.तर आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. यावेळी अक्षता म्हणून नेहमीप्रमाणे फुलांच्या पाकळ्या वापरण्यात येणार आहे तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्थ प्रा.सुदाम धाडगे करणार आहेत.

आयोजक पानवण गावच्या च्या सरपंच सौ.जयश्री व डॉ.नानासो शिंदे म्हणाले की लोणारी समाजातील जरी हा पहिला सत्यशोधक विवाह असला तरी आजच्या विज्ञान युगात आता वास्तव सर्व गोष्ठी माहिती होत असल्याने आपण आता अंधश्रध्दा , कर्मकांड , पंचांग आणि मुहुर्थ याला तिलांजली देऊन महापुरशांचे विचाराने मानवताधर्म एकच समजून या पुढे सर्व कार्य पाडावीत.यासाठी दुसर्यांना सांगणे अगोदर मी माझ्या उच्चशिक्षित मुलाचा विवाह आणि महाराष्ट्र गुजरात जरी प्रांत वेगवेगळा असला तरी देखील आपलेच बांधव रोजी रोटी निमित बाहेर गेलेले आहेत.त्यांना जवळ करणे जरुरीचे आहे. स्री पुरुष समानता या उक्ती प्रमाणे दोन्ही कुटुंबाने निर्णय घेऊन वधू वरांचे वेळेत आर्थिक उधळपट्टी न करीता गरजूंना दानधर्म व शिक्षणासाठी मदत करीत सत्यशोधक पध्द्तीने विवाह लावावेत असे देखील सर्व समाजबांधवांना आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here