Home महाराष्ट्र मधमाशी दिनानिमित्य पुरस्कार वितरण करण्यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज आमंत्रित

मधमाशी दिनानिमित्य पुरस्कार वितरण करण्यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज आमंत्रित

89

उपक्षम रामटेके, सहसंपादक मो. 98909 40507
चंद्रपूर,: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ अंतर्गत मध संचालनालय, महाबळेश्वर येथे 20 मे 2023 रोजी मधमाशी दिनाचे औचित्य साधून मधमाशी पालन उद्योगांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लाभार्थ्यास मधमाशी मित्र पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळाअंतर्गत मध संचालनालय, महाबळेश्वर येथे सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मधमाशा उद्योगांमध्ये सातेरी, मालीफेरा व आग्या मधमाशांचे संगोपन करून मधाचे उत्पादन घेणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. त्याकरीता सदर व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्जासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा माळा, उद्योग भवन, एस.टी स्टँड समोर येथील कार्यालयास संपर्क साधावा. तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी 07172-252142 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी. एल. मेश्राम तसेच औद्योगिक पर्यवेक्षक आर.आर. हुमणे यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी. एल. मेश्राम यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here