Home महाराष्ट्र १३ व १४ मे रोजी गंगंखेडला होणार राज्यस्तरीय पहिले गझल संमेलन ...

१३ व १४ मे रोजी गंगंखेडला होणार राज्यस्तरीय पहिले गझल संमेलन गझल मंथन साहित्य संस्था व मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचा साहित्यिक उपक्रम

134

 

अनिल साळवे,गंगाखेड (प्रतिनिधी) गंगाखेड- आध्यात्मिक भूमी असलेल्या गंगाखेड शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक वसा दृढ करण्यासाठी गझल मंथन साहित्य संस्था व मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने येत्या १३ व १४ मे रोजी शहरातील स्व.गोपीनाथ मुंडे अन्नछत्रालय येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय पहिल्या गझल संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे जनाईनगरीत गझलेचे सूर गुंजणार आहेत, अशी माहिती गझलकार यशवंत मस्के यांनी दिली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी पुणे येथील प्रसिद्ध कवी व गझलकार प्रमोद दादा खराडे तर स्वागताध्यक्षपदी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय गझल संमेलनासाठी राज्य तसेच इतर राज्यांमधून प्रतिथयश तसेच नवोदित गझलकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, निमंत्रितांचा गझल मुशायरा, पुस्तक प्रकाशन, गझल मैफिल आणि पुरस्कार वितरण अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पहिल्या गझल संमेलनास गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वासुदेव घुमटकर, सचिव जयवंत वानखेडे, भरत माळी तसेच मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे, सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, सदस्य हनुमंत लटपटे, राजेभाऊ बापू सातपुते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नियोजन समितीचे अध्यक्ष गझलकार यशवंत मस्के याच्यासह कवी विठ्ठल v इंगोले, शिवशंकर डोईजड, संजय तिडके, गणेश नरवटे विशेष परिश्रम घेत आहेत.
यांच्या गझलेची असेल मेजवानी…
संमेलनात उपस्थित गझलप्रेमींना डॉ.कैलास गायकवाड, डॉ.शिवाजी काळे, श्याम खामकर, डॉ.स्नेहल कुलकर्णी, नितीन देशमुख, निलेश कवडे, डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.राज रणधीर, समीर बापट, उर्मिलामाई बांदिवडेकर या प्रसिद्ध गझलकारांच्या आशयपूर्ण व अर्थपूर्ण गझलांचा आस्वाद घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here