चंद्रपूर – नागपूर जात असलेली डी. एन. आर. ट्रॅव्हल्स क्र.एम एच ३४ बीएच ७५७७ ने विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र.एम एच ३४ एबी ३८४० ला धडक दिली.सदर घटना २३ एप्रिल ला दुपारी अंदाजे २ वाजता च्या सुमारास नंदोरी टोल नाका उड्डाण पुलाजवळ घटना घडली.
टॅव्हर्स मधील प्रवासी प्रतीक रवींद्र अलाम वय २३ रा.टेकाडी, अतुल प्रभाकर ठाकरे वय ३२ रा.खैरी, ता.राळेगाव, शुभम रमेश पोपलवार वय २० रा.चंद्रपूर, अश्विनी शंकर मेश्राम वय २५ रा.नागपूर हे गंभीर जख्मी झाले.उपचारार्थ सर्वांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले, परंतू प्रकृती गंभीर असल्याने चारही जख्मी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.घटनेची पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.




