सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबाईल 9075686100
म्हसवड : म्हसवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती निमित्त 21 एप्रिल रोजी फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या आघाडीच्या वक्त्या प्राध्यापिका सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी सुषमाताई अंधारे बोलताना म्हणाल्या की एवढाच जर का मोदी सरकारला ओबीसींचा पुळका असेल तर त्यांनीही हिम्मत असेल तर ओबीसींची जातनिहाय जणगनना करून दाखवाच असे आवाहन जाहीरपणे मोदी सरकारला केले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नगरपरिषदेसमोर सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सुषमाताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या व्याख्यानामध्ये बोलताना सुषमाताई अंधारे म्हणाल्या मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी राजकारण बाजूला ठेवून निव्वळ आणि निव्वळ ओबीसी आरक्षणाचे मुद्दे, त्यांचे हक्क अधिवेशनात मांडले पाहिजे जर का मोदी आणि भाजपला ओबीसी बाबत इतका पुळका असेल तर त्यांच्या मानसन्मान, हक्कासाठी ओबीसींची जातीनिहाय जण गणना करून दाखवावी. महिलांची राजकारणातील एंट्री ही त्यांच्या कुटुंबातील पुरुषांमुळे झाली कोणताही अनुभव, वारसा, विचार नसताना स्वतःची ओळख निर्माण करणार महिला चेहरा सध्या तरी महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही महिलांना राजकारणात पावर आणि पोझिशन ही पाहायला मिळत नाही.
ओबीसींच राजकारण प्रचंड भरकटल्यासारखं वाटते आहे ओबीसींचे हक्क वारंवार डावले जातात त्यांणी आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे बाबासाहेब म्हणतात गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल जोपर्यंत ओबीसी हक्कासाठी लढणार नाही तोपर्यंत त्यांची फस गंमती होतच राहणार ओबीसींची जात निहाय गणना झाल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि नोकरीं, शैक्षणिकआणि राजकारनात ओबीसीचा टक्का वाढणार नाही त्यासाठी ओबीसी खासदार आणि आमदार यांनी ओबीसींचे मुद्दे पार्लमेंट मध्ये मांडले पाहिजे ती त्यांची संविधानिक जबाबदारी आहे येणाऱ्या ओबीसी पिढ्यांना दिशा द्यायची असेल तर त्यांना राजकारणात वाटा हा मिळालाच पाहिजे.
पुढे बोलताना सुषमाताई म्हणाल्या वर्गीय राजकारणात आणि जातीय राजकारणात जात संघर्ष मोडीत काढणे गरजेचे आहे व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतून आलेल्यांना काही समजत नाही त्यांना फक्त कॉपी पेस्ट फॉरवर्ड करायला आवडते समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा सुतराम संबंध नाही समान नागरी कायदा हा कुठलाही जाती धर्मासाठी नाही तर तो फक्त महिलांसाठी आहे ओबीसी आणि बहुजनांमध्ये धार्मिक राजकारणाचे बीज पेरण्याचे काम सध्या जोरात चालू आहे जेव्हा बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, महागाई या मुद्यावर सरकार फेल ठरल्यानंतर हिंदू धर्माचे कार्ड काढलं जातं आणि हिंदू खत्रे मे हे बोलले जात कातर जनता या प्रमुख मुद्द्यांपासून दुर्लक्षित झाली पाहिजे यावेळी ते लोक महापुरुषांच्या किंवा धर्माच्या आड लपतात हे राजकारण थांबले गेले पाहिजे.
माळी समाजाला त्यातल्या त्यात म्हसवड मधील माळी समाजांला महात्मा फुले हे कळले पाहिजेत ज्यांना फुले कळले त्यांना मानसिक गुलामीतून बाहेर पडणं काय असते हे लक्षात येईल मी कर्मकांडाच्या विरुद्ध आहे श्रद्धेच्या विरुद्ध नाही सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींना शिक्षण दिले पण या देशातील महिला या आज पण उपेक्षितच आहेत त्यांना स्वकर्तृत्व मिळतच नाही महिलांना अधिकार मिळवण्यासाठी पिढ्यानपिढ्या संघर्ष करावाच लागणार आहे यासाठी हक्क मिळवण्यासाठी महिलांनी पुढे येण्याचे आवाहन यावेळी सुषमाताईंनी केले या व्याख्यानासाठी म्हसवड शहरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी आभार प्रदर्शन व्यक्त करताना कैलास तोरणे यांनी आठ दिवस म्हसवड शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ने जे काही कार्यक्रम राबविले त्या कार्यक्रमाचे सर्वश्रेय उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि बौद्ध बांधवांनचे असल्याचे सांगितले.




