Home Breaking News हातपंप दुरुस्त करून मुक्या जनावर करिता केली पाण्याची सोय

हातपंप दुरुस्त करून मुक्या जनावर करिता केली पाण्याची सोय

77

 

 

कोरची – वसीम शेख
कोरची मुख्यालयापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर झंकारगोंदी फाट्या नजीक असलेल्या ढोलीगोटा या देवस्थानाच्या बाजूला असलेल्या हातपंप हा काही दिवसापूर्वी नादुरुस्त झालेला होता. सदर हातपंप जवळ नेहमी माकडांची टोळी असते तसेच परिसरातील मुक्या जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याकरिता सदर हात पंप हे खूप उपयोगी असल्यामुळे या हातपंपाची तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी गट विकास अधिकारी राजेश फाये यांच्याकडे केली होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मुक्या जनावरांची पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करावी लागत होती सदर मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सदर हातपंप दुरुस्त करून मुक्या जनावरांकरीता पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली आहे.
या मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून या हातपंपद्वारे जनावरांकरिता पाण्याची व्यवस्था करण्यात येते. सदर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे येथून वाहन चालक हे सुद्धा पिण्याकरिता पाण्याचा उपयोग करीत असल्यामुळे येजा करणाऱ्या प्रवासांकरीता हा पंप बहुउपयोगी असून नादुरुस्त असलेला हातपंप तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी आशिष अग्रवाल यांनी केली होती व सदर बाबीची गांभीर्याने दखल घेत तातडीने सदर हातपंप दुरुस्त करण्यात आले. यावेळी पंचायत समिती कोरची येथील गटविकास अधिकारी राजेश फाये, यांत्रिकी एम. एम. सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ट्राय सेम कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सदर हातपंप दुरुस्त करण्यात आले.

Previous articleवडूज नगरीत डॉ आंबेडकर जयंती निम्मित इफ्तार पार्टीत जय भिम,, जय मिम चा बुलंद नारा…
Next articleचंद्रपुरातील १०० कलावंतांचा नागपुरात ‘गर्जा महाराष्ट्र’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here