Home चंद्रपूर पुरोगामी शिक्षक संघटना जिल्हा सरचिटणीसपदी सुरेश गिलोरकर यांची निवड

पुरोगामी शिक्षक संघटना जिल्हा सरचिटणीसपदी सुरेश गिलोरकर यांची निवड

116

 

चंद्रपूर – पुरोगामी शिक्षक संघटना ही प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रगण्य संघटना आहे . यापूर्वी संजय चिडे यांच्या नेतृत्वात संघटनेने दमदार कार्य केले . कित्येक समस्या निकाली काढून संघटन अधिक बळकट केले . परंतु प्रकृती अस्वास्थ्य व कौटुंबिक व्यस्तता यामुळे संजय चिडे यांनी फेब्रुवारी महिन्यात सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला . त्यामुळे जिल्हा कार्यकारिणीने एप्रिल महिन्यात घेतलेल्या सभेत सर्वानुमते रिक्त झालेल्या सरचिटणीसपदी सुरेश गिलोरकर यांची निवड केली .
प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या व विषयावर आढावा तसेच चर्चा करून नियोजन करण्याकरिता जनता महाविद्यालयात आयोजित सभेला जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , राज्यनेते विजय भोगेकर , जिल्हा महिलाध्यक्ष विद्या खटी , जिल्हानेत्या सुनीता इटनकर , कोष्याध्यक्ष सुनील कोहपरे , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे , उपाध्यक्ष रवी सोयाम , सुभाष अडवे , राज्यसचिव निखिल तांबोळी , लोमेश येलमुले , दुष्यांत मत्ते , मनोज बेले , सर्व तालुक्यातील अध्यक्ष , सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते सुरेश गिलोरकर यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here