धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाज सुधारक, विचारवंत, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक शाळेतील इतिहास विभाग प्रमुख व्ही टी माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी तात्यासाहेबांचे शैक्षणिक सामाजिक कार्य विशद करून तात्यासाहेब व माईंचे विचार आपल्यासाठी ऊर्जा देणारे आहेत त्यांचे विचार आत्मसात करा व समाज प्रबोधन करा असा मोलाचा संदेश पाटील यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी मुलांना तात्यासाहेबांचे जीवन कार्य सांगितले. घरी चित्र काढून किंवा मोबाईलला भाषणाची क्लिप तयार करून प्रसार माध्यमांना प्रचार प्रसार करा व तात्यासाहेबांचे कार्यक्रम पोहोचवा. स्त्रियांना खऱ्या अर्थाने गुलामगिरी मुक्त करणारे फुले दांपत्यच आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इतिहास विभाग प्रमुख व्ही.टी. माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी चे साठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.




