Home महाराष्ट्र घेरलं ग आडरणी! हमलावर चहुकोनी!,सोडवा संविधान..! सोडवा संविधान..!-शाहीर संभाजी भगत

घेरलं ग आडरणी! हमलावर चहुकोनी!,सोडवा संविधान..! सोडवा संविधान..!-शाहीर संभाजी भगत

212

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.10एप्रिल):-सम्राट अशोक, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आयोजित धम्म क्रांती प्रज्ञा पर्व 2023 चा आज दुसरा दिवस आंबेडकरी जलसाकार संभाजी भागत यांच्या शाहिरीने लक्षवेधी ठरला!

सुरवातीला सुजाता महिला मंडळ इटावा आणि यशोधर महीला मंडळ तथागत नगर यांनी बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. महेश हंबर्डे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कल्याण साखरकर, सुखदेव भगत, दत्तराव गंगाळे निशांत बयास, बळवंत मस्के, शितलकुमार वानखेडे, बाळासाहेब कांबळे, बाबाराव उबाळे,अरुण पाईकराव, शेख नईम, शरद ढेंबरे ,आत्माराम जाधव,होते. कार्यक्रमाचं निवेदन जनार्दन गजभिये यांनी तर आभार विकास मनवर यांनी मानले.

देशात प्रतिगामी शक्ती वाढल्या असून त्यांना मनुस्मृतीला अभिप्रेत समाज व्यवस्था हवी आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांच्या आड भारतीय संविधान येत आहे. अशावेळी भारतीय संविधानाचा मूळ घाभाच बदलून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संविधान त्या प्रतीगम्यानी घेरले असून ती सोडवण्याची जबाबदारी आंबेडकरी समूहाची आहे.
*इनकी सुरत को पहचानो भाई*
*इनसे संभाल के रहेना रे भाई!*
देश भांडवलदारांच्या, सत्ताधिषांच्या मुठीत असून सामान्य कष्टकर्यांच. शोषण सुरू आहे. वंचित समाज आणि मजूर होरपळून निघाला आहे. अशावेळी या लोकांना ओळखून समाजाने वागायचे आहे! समाजाला बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांची गरज आहे! बाबासाहेब येणार आहेत पण ते पुतळ्या तून येणारं नाहीत. किंवा पुन्हा जन्म घेणार नाहीत तर ते इथल्या तरुणाच्या, महिलांच्या चळवळीतून येणार आहेत.
या आंबेडकरी जलशाचा समारोप हा शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून झाला. यशवंत रंग मंदिरावर झालेल्या या कार्यक्रमाला अलोट गर्दी होती. संभाजी भगत हे ख्यातनाम शाहीर, कवी, दिग्दर्शक आहेत त्यांचा कोर्ट या चित्रपटाचा प्रवास ऑस्कर पुरस्काराच्या शर्यती पर्यंत झाला, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे. त्यांच्या शहीरीन आजचा दुसरा दिवस प्रबोधन व मनोरंजन यांनी भरून गेला!

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कांबळे नत्तुजी वाहुळे नारायण ठोके, नितेश खंदारे, संतोष गायकवाड, अंबादास वानखेडे, प्रफुल भालेराव, विष्णू सरकटे, परमेश्वर खंदारे, प्रीतम आळणे, राजू पठाडे, समाधान केवटे, जगदीश सावळे, मुन्ना. हाटे, संजय वाढवे, प्रा. सुनील खाडे, विकास मनवर, साहेबराव गुजर, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, अंबादास कांबळे, मधुकर सोनोने, दिनेश सावळे,रंगराव बनसोड आदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here