Home महाराष्ट्र १३ एप्रील रोजी चिमुरात महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त...

१३ एप्रील रोजी चिमुरात महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह

99

🔸अनिरुध्द वनकर व कोमल धांडे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम-महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.9एप्रिल):-चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) कॉग्रेस कमेटी ओबीसी / अनुसूचित जाती विभागाच्या वतीने दिनांक १३ एप्रील रोजी चिमुर येथील नेहरु विद्यालयाचे पटांगणावर महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह आयोजीत केला असुन याप्रसंगी “मी वादळ वारा” फेम गायक अनिरुध्द वनकर व “येवु कशी तशी मी नांदायला” फेम गायक कोमल धांडे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले, सहुउद्घाटक खासदार बाळू धानोरकर यांचे हस्ते होणारअसल्याची माहिती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमेटी ओबीसी विभागचे जिल्हा अध्यक्ष दिवाकर निकुरे यांनी दिली.

यावेळी विशेष म्हणुन आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभागचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभागचे प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबोरे, कॉग्रेस कमेटीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार अविनाश वारजुकर, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, कांग्रेस ओबीसी विभागचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, कॉग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष जेसाभाई मोटवानी, चंद्रपूर जि. प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, ओबीसी विभागचे राष्ट्रीय समन्वयक अॅड. गोविंद भेंडारकर, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस गजानन बुटके, चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या नम्रता ठेमस्कर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, चंद्रपूर जिल्हा अनुसूचित जाती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, चिमुर तालुका अध्यक्ष विजय गावंडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी चिमुर तालुका प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागचे प्रदेश संघटक धनराज मुंगले, माजी जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, माजी नगरसेवक उमेश हिंगे, चिमुर तालुका अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष जाहीद भाई शेख, युवक कॉंग्रेसचे महासचिव गौतम पाटील, ई- रिक्षा असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते नितीन कटारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तथा स्वागताध्यक्ष दिवाकर निकुरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here