✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.8एप्रिल):-तालुक्यातील धम्मभुमी सुगतकुटी येथे २५ फुट उंच तथागत बुद्ध तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे निर्माण करण्याचे चिमूर विधानसभा निर्वाचण क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी (ओबीसी) दिवाकरभाऊ निकुरे यांनी संकल्प केला. त्याप्रमाणे ५ फेब्रुवारीला कामाचे धम्मविधी प्रमाणे भुमिपुजन करण्यात आले. या निर्माण कार्याला सुरवात झाली आहे.
तथागत बुद्ध तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २५ फुट उंच मुर्तीने तालुक्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे हे काम उच्च दर्जाचे तथा भावी पिढीला यातुन प्रेरणा मिळावी याकरीता भक्कम व्हावे या साठी स्वतः युवा नेते दिवाकर भाऊ निकुरे जातीने लक्ष देत आहेत. ७ एप्रिल रोज शुक्रवारला प्रत्यक्ष सुगतकुटी येथेविशेष! जाऊन पाहणी करून निकुरे यांनी कामा विषयी सुचना केल्या. यावेळेस त्यांचे सोबत गौतम पाटील, पारस नागरे, श्याम बागडे, गोंविदा दाने, अश्विन उपासे, वैभव कोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.इ
