Home महाराष्ट्र वाकोला म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण

वाकोला म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण

85

🔸तक्रार दिली म्हणून RPI संविधान पक्षाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.8एप्रिल):- वाकोला सांताक्रूस येथील म्हाडाच्या जागेवर अतिरिक्त अतिक्रमण केले असून तशी तक्रार दिल्याने आर पी आय संविधान पक्षाच्या बंजारा विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण यांना राम राठोड नावाच्या कंत्राटी गावगुंडाने जीवे मारण्याची दिली दिल्याची घटना नुकतीच घडली आहे.

सांताक्रूस (पूर्व) आनंद नगर वाकोला परिसरात खाली वरी अस 450 चौरस फुट चटई क्षेत्राफळात सदनिका वाटप झाल्या असतानाही स्थानिकांनी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस व स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून 2000 तर कोणी 6000 चौरस फुट आकाराचे वाढीव बांधकाम केले आहे.

सदर घटनेची तक्रार व पाठपुरावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) वंजारा विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण मागील वर्ष भरापासुन करत आहेत. मात्र; म्हाडा व बृहन्मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी यात सहभागी असून् जाणीवपूर्वक कानाडोळा करून अतिक्रमण करू दिले जात आहे शिवाय सदनिका फक्त राहण्याकरिता दिलेल्या असताना त्या व्यवसायिक करन्या करिता वापरत आहेत.

पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी सुद्धा सदर प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. 210 सदनिका धारकांनी अतिरिक्त अतिक्रमण केले असून बांधकामासाठी या परिसरात झाडे सुद्धा तोडली जात आहेत.

भीमराव राठोड व राम राठोड या बांधकाम कॉन्ट्रॅक्टर मार्फत अतिक्रमन बांधकामे होत असून अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैध्य बांधकाम करवून देण्यासाठी अतिरिक्त रक्कम घेतली जात असून अतिक्रमनांवर बुलडोजर चालवल्या शिवाय गप्प बसणार नसल्याचे मत् रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षा चे बंजारा विभाग राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here