✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.26मार्च):-जय विदर्भ & 9 स्टार क्रीडा मंडळ किटाळी (बोर) ता. नागभीड जि.चंद्रपूर यांच्या सौजन्याने दिनांक :9 मार्च 2023 ला सुरू झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विजयभाऊ वडेट्टीवार माजी पालकमंत्री चंद्रपूर तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल खापर्डे माजी सभापती पं.स. नागभीड यांच्या हस्ते पार पडले.
या बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाकरभाऊ निकुरे युवानेते चिमुर विधानसभा क्षेत्र, विशेष अतिथी म्हणून हेमराज लांजेवार सरपंच सेवासंघ अध्यक्ष चंद्रपूर , सरपंच छगन कोलते, प्रमोद गायकवाड माजी सरपंच सोनूली, उपसरपंच दिपक ठाकरे, पारस नागरे, रमेश कामडी, मंडळाचे सदस्य, महिला, गावकरी उपस्थित होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक बाळापूर संघ, द्वितीय ओवाळा संघ, तृतीय क्रमांक जवराबोडी मेंढा संघांनी पटकावला. त्यामुळे सर्व विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन करण्यात दिवाकर निकुरे युवानेते चिमुर विधानसभा क्षेत्र यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले तसेच कांग्रेस ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष म्हणून निवडीमुळे मंडळाकडून सत्कार करण्यात आले, आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पुन्हा अशा स्पर्धा यशस्वी करण्याची मंडळातर्फे ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भुपेश भाकरे यांनी केले.
