✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.22मार्च):-ज्येष्ठ नागरिकांना ७५ वर्षांवरील बसमध्ये मोफत प्रवास तर आता महिलांसाठी “महिला सन्मान योजने अंतर्गत ” प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत सुरू केली आहे मात्र ग्रामीण भागातील काही ठिकाणी मुलींना शाळेसाठी दररोज ३-४ किलोमीटर पायपीट करावी लागते त्यांना सुविधा देऊन शासन सन्मान कधी करणार?? पायपीट थांबवण्यासाठी शाळेच्या वेळेत बस सुरू करण्यात यावी अशी मागणी मुलींमधुन होत आहे.
महाराष्ट्र शासनाने सन २२३-२४ च्या अर्थ संकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत लागु केली आहे.गेल्या वर्षी २५ आगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव निमित्त मुख्यमंत्री यांनी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाचा उपक्रम सुरू केला होता.
पाटोदा तालुक्यातील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर सौंदाणा फाट्यावर सौंदाणा गावातील मुलींना दररोज शाळेसाठी येण-जाणे साडेतीन कीलोमीटर पायपीट करावी लागते.सौंदाणा येथील मुलींना बसची सोय नाही.सौंदाणा फाट्यावरून पाटोदा येथील भामेश्वर विद्यालयात शिक्षण घेतात.याचप्रमाणे ग्रामीण भागातील बऱ्याच गावातील मुलींना शाळेसाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत असून शासनाने अशा गावांमध्ये शाळेच्या वेळेत बस सुरू करावी अशी मागणी होत आहे.




