Home महाराष्ट्र एस.टी भाडे सवलतीमुळे खाजगी प्रवासी वाहतूक धारकावर येणार आता उपासमारीची पाळी

एस.टी भाडे सवलतीमुळे खाजगी प्रवासी वाहतूक धारकावर येणार आता उपासमारीची पाळी

225

🔹Due to ST fare concession, private passenger transport operators will now starve

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.20मार्च):-महाराष्ट्र शासनाने महिलांना एसटी महामंडळामध्ये 50 टक्के तिकिटेत सवलत प्रदान केलेली आहे, त्यामुळे राज्यातले खाजगी वाहतूकदार ट्रॅव्हल्स, ऑटो रिक्षा, टॅक्सी यांचे व्यवसाय डबघााईस आलेले दिसून येत आहे. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण भरपूर आहे. सरकारी नोकऱ्या लागत नाही, प्रावेट कंपन्या कर्मचारी कपात करीत असतात, असे असताना बेरोजगार युवकांनी टॅक्सी, ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स इत्यादी व्यवसाय सुरू करून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

एसटी प्रवास भाड्यात शासनाने सवलती दिल्याबरोबर कित्येक ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॅव्हल्स यांचे दोन-तीन दिवसापासून चाके सुद्धा हलताना नाहीत, नेहमी तोट्यात चालणारी एसटी महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सहकार्यावर धावत असते, त्यामध्ये सुद्धा सवलतीची भर पडली आहे. टॅक्स च्या स्वरूपात, विमाच्या स्वरूपात कराच्या स्वरूपात कोट्यावधी रुपये शासनाला प्रत्येक वाहन मालक देत असतो, हा झाला शासनाचा शुद्ध नफा. महाराष्ट्र शासनाने ह्या स्वयंरोजगारावर सुद्धा सवलत देण्यात यावी,टॅक्स कमी करण्यात यावा, विमा कमी करण्यात यावा, चालांचे फाईन कमी करण्यात यावे.

ग्रामीणक्षेत्रापेक्षा शहरी क्षेत्रात ही सवलत जास्त लाभदायक राहील कारण शेतकरी, मजूर वर्षाचे आठ महिने शेतात कामे करीत असतात, शिंदे-फडणवीस युती सरकारने आगामी निवडणुका पाहता महिलांचे मते आपल्याला मिळावी म्हणून ही योजना तात्काळ लागू केली. गरीबाचे भले करायचे असेल तर सिलेंडरचे रेट कमी करा.

त्यामध्ये 50% सबसिडी द्या, या योजनेमध्ये फक्त शासनाच्या तिजोरीवर भर पडेल,बाकी काही साध्य होणार नाही. ट्रॅव्हल्स, टॅक्सी,ऑटो रिक्षा धारकाची मागणी आहे की, आम्हाला टॅक्स इन्शुरन्स, चलांचे फाईन वर 50% सबसिडी देण्यात यावी अशी मागणी चिमूरच्या ट्रॅव्हल्स धारक बबलू कुरेशी, जावा शेख, प्रवीण वरगंटीवार, सचिन नगराळे नागपूर, धीरज खाडे, सिराज शेख, गौतम पाटील, समीर शेख, श्री कोलते, दिनेश,निलेश, बंटी,आवेश फारुकी, काशीद काजी आदीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here