(1984 पासून उमरखेड बसस्थानक व उमरखेड नगरीत फिरून पेपर विक्री करून अल्पशा मानधनावर आपली उपजीविका करून समाधानाने जीवन जगणारा संजय प्रभाकर नागापुरे)
✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड (15 मार्च)- दि.14 मार्च रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजता अमोल माकोडे मुख्य पेपर विक्रेते व त्यांची मित्रमंडळी संजय प्रभाकर नागापुरे यांचा 64 वा वाढदिवस पुष्पगुच्छ व पेढा भरून केला. वाढदिवस साजरा केल्यामुळे नागापुरे यांना आनंदाचा जणू काही धक्काच बसला त्यामुळे उमरखेड नगरीमध्ये एका सामान्य साध्या प्रांजल व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस साजरा केल्यामुळे एक आनंदाची वार्ता भ्रमणध्वनी द्वारे सर्वांना मिळाली.
नागापुरे एक ईमानदार समजदार अल्पशा नफ्यावर समाधान मानणारे त्या काळातील बीए पर्यंत शिक्षण झाले. पण नोकरी मिळाली नाही. लग्नही केले नाही. पण इंग्रजी व मातृभाषा मराठी वर चांगली पकड आहे. हे त्यांच्या बोलण्या चालन्यातुन दिसून येते.
शोले चित्रपटातील हिंदी डायलॉग मारण्याची त्यांची कसब एक वेगळीच आहे. अरे…. ओ सांभा…! कितने आदमी थे? या डायलॉगमुळे ते उमरखेड नगरीत लहान थोर मंडळींना ते खूप परिचित झाले. अशा या दिलदार व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस पेपर विक्रेते व पत्रकार मंडळी रवींद्र वान्नेरे अमोल माकोडे प्रसन्न जोशी पांडुरंग पिंजरकर व्यंकटेश पेन्शनवार रमेश माकोडे यांनी नागापुरे यांचा अतिशय उत्साहाने बोधिवृक्ष पिंपळाच्या झाडाखाली वाढदिवस साजरा केला. हे मात्र विशेष म्हणावे लागेल.




