✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.14मार्च):-१ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त राज्य शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी .या प्रमुख मागणीसाठी आज दि. १४ मार्च २०२३ पासून पुसद तालुक्यातील सर्व विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला.
महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप कोलेवाड व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मोहटे यांच्या नेतृत्वामध्ये पंचायत समिती पुसद येथून सकाळी १० वाजता पायदळ रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयावर भव्य रॅली आली. रॅलीचे रूपांतर सभेत झाल्यानंतर त्या ठिकाणी विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रदीप मोहटे, दिलीप कोलेवाड, मनीष राठोड, शितलकुमार वानखेडे, यशवंतराव देशमुख, तिवारी सर, शहजाद सर, सुरेश राठोड ,मनोज रामधनी, शिद्धोधन कांबळे ,अमित बोजेवार, दीपक भवरे ,कंदी सर, दिनेश वेळुकर, दादाराव देशमुख, अनिल ढोके ,दिलीप पवार, मधुकर मोरझडे, गजानन होंडे गोविंद जाधव वंदना चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
एक नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नवीन पेन्शन योजना एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती वेतन नियम १९८२ व नियम १९८४ पुन्हा पुर्ववत लागू करावी .या प्रमुख मागणीसाठी दिनांक १४मार्च २०२३पासून पुकारण्यात आलेल्या राज्य शासकीय सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य सरकार सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संप आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याचा प्रभाव पुसद तालुक्यातील सर्व शाळा कार्यालयावर पडलेला आहे.
पुसद तालुक्यातील शंभर टक्के सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी आज संपावर आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळा मधील ९७टक्के शिक्षक या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. पर्यंत जुनी पेन्शन योजना शासन लागू करत नाही तोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही असा सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी निर्धार केला.या संपामध्ये पुसद शहरातील सर्व विभागातील ३४ संघटनासह कर्मचारी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.




