🔹जुन्या पेन्शन योजनेसाठी 14 मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप
✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466
उमरखेड ( दि. 14 मार्च):-एकच मिशन जुनी पेन्शन एन पी एस रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी 14 मार्च 2023 पासून पुकारलेल्या बेमुदत संप पुकारला.
या संपात उमरखेड तालुका समन्वय समिती सहभागी झाली असून एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज नगरपरिषद तहसील कार्यालय पंचायत समिती यासह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शहरामध्ये जुन्या पेन्शन योजनेबद्दल जनजागृती रॅली काढून उमरखेड तहसील कार्यालयाच्या आवारात आपल्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.
तर याप्रसंगी धरणे आंदोलनात सहभागी शेकडो कर्मचाऱ्यांनी पेन्शन
आमच्या हक्काची…!
नाही कुणाच्या बापाची..!!,
असे कसे मिळत नाही.. मिळालेच पाहिजे…!एकच मिशन जुनी पेन्शनचे नारे देऊन उमरखेड वासीचे लक्ष वेधत शासनाला जागविण्याचा प्रयत्न केला.यादरम्यान विविध संघटनाने आंदोलन कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या रास्त मागणीला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला.




