✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.14मार्च):-महाराष्ट्रातील बारा वर्षापासून बुडालेला यशवंत सहकारी साखर कारखाना रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शेतकऱ्याचं लेकरू रामदास कोतवाल व कार्याध्यक्ष हेमंत चौधरी आणि रयत शेतकरी संघटनेचे हवेली तालुक्याचे पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी तीन वर्षांपासून पाठपुरावा करून अखेर यशवंत सहकारी साखर कारखाना बाहेर काढलाच. पुणे जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, यांच्यासाठी महाराष्ट्राचा रामदास कोतवाल यांनी व रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी बुडालेला यशवंत सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी मागील तीन वर्षांपासून रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तंतोतंत पाठपुरावा करून लढला व अखेर जिंकलाच महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शेतकऱ्यांचा ठाण्या वाघ रामदास कोतवाल यांनी केले आहे.
यामुळे शेतकरी वर्गातून आनंद उत्साह होत असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षानेही यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात विचार देखील केला नाही. ते विचार रामदास कोतवाल यांनी करून अखेर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे नाव या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल व कार्याध्यक्ष हेमंत चौधरी यांनी पाठपुरावा केला असून वेळोवेळी आंदोलने करून यशवंत सहकारी साखर कारखाना अखेर चालू केला.
रयत शेतकरी संघटनेची मेहनत..
_____________________________
राज्यातील सत्तापलट रवारमध्ये राजकीय नेत्यांना पलटवार करणारा रामदास कोतवाल यांनी अखेर यशवंत सहकारी साखर कारखाना जिंकला याचे सर्व श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाला न जाता रयत शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हे झाले आहे. सभासदांचे आशिर्वाद आणि रयत शेतकरी संघटनेची मेहनत ह्या गोष्टीमुळे हे झाले झाले आहे. प्रशासकीय शिष्टिम मध्ये कामकाजाला सुरुवात झाली असून आता जनरल मीटींग होऊन त्याचे इलेक्शन चालू होणार असल्याचे रामदास कोतवाल यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्यापासून शेतकऱ्यांना फायदा होणार
_____________________________
बारा वर्षापासून बंद पडलेला यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी रामदास कोतवाल व रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी तळमळीने पाठपुरावा करून हे यश प्राप्त केले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून आनंद उत्साह होत आहे. या कारखान्यांमुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असल्याचे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले आहे




