Home महाराष्ट्र सोलापुर तालुका माढा मौजे दहिवली येथील तलाठी लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

सोलापुर तालुका माढा मौजे दहिवली येथील तलाठी लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

292

✒️सोलापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सोलापूर(दि.13मार्च):-शेतजमीन विभक्त करून वेगवेगळे उतारे करून देण्यासाठी तलाठ्याने ३५ हजारांची लाच मागितली होती. तडजोड अंती ३० हजार रुपये ठरले होते. त्यामधील पहिला हफ्ता म्हणून १० हजार देण्याचे ठरले होते.

लाच घेण्यासाठी सरकारी लोकसेवक काय शक्कल लढवतील याचा अंदाज लावणे अवघड आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहीवली गावचे तलाठी सहदेव शिवाजी काळे (वय ५४ वर्ष) यांना राहत्या घरी शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. धक्कादायक म्हणजे तलाठ्याच्या बायको- पोरांसमोरच एसीबीने कारवाई केली.

शेतजमीन विभक्त करून वेगवेगळे उतारे करून देण्यासाठी तलाठ्याने एकूण ३५ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोड अंती ३० हजार रुपये ठरले होते. त्यामधील पहिला हफ्ता म्हणून १० हजार देण्याचे ठरले होते. तक्रारदार याने याबाबत एसीबीच्या सोलापूर कार्यालयात तक्रार केली होती. एसीबीने कारवाई करत, तलाठी सहदेव काळे यांस लाच घेताना रंगेहाथ कारवाई केली आहे. विशेष म्हणजे तलाठी सहदेव शिवाजी काळे याने स्वतःच्या निवासस्थानी सज्जा कार्यालय थाटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here