✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.13मार्च):- शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, डोअर पॉलिशचं काम करणाऱ्या एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.विशेष म्हणजे या कामगाराने आधी कानाला हेडफोन लावला आणि त्यानंतर बेल्टने खिडकीला गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा केला आहे. बेल्टने खिडकीला गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कामगाराने कानाला हेडफोन लावून त्यानंतर बेल्टने खिडकीला गळफास घेतल्याचा प्रकार बीड शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातील नवीन इमारतीमध्ये रविवारी (12 मार्च) सकाळी दिसून आला. मयत हा या ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मजुरी करत असल्याचे समोर आले आहे. सुरज ललन यादव असे मजुराचे नाव आहे. बीड जिल्हा रुग्णालय परिसरात नवीन इमारतीचे काम सुरु आहे. तर सुरज हा मजुरीसाठी सात दिवसांपूर्वी आला होता. तो डोअर पॉलिशचे काम करत होता.
आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट
_________________________
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (11 मार्च) मध्यरात्री सुरज यादव याने बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खिडकीला बेल्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या कानाला मोठा हेडफोन होता. घटनेची माहिती मिळताच ठाण्यातील बाळासाहेब सिरसाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट असून, घटनेसंदर्भात पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे.




