✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 11 मार्च):-जो पर्यंत समाजात आम्ही महिलांना बरोबरीने स्थान व अधिकार देणार नाही तो पर्यंत या देशाची महिला ती अबला म्हणूनच जिवन जगेल.ती आपले वेदना स्वतंत्रपणे अभिव्यक्त करू शकत नाही. तीला समाजात घरात वावरताना पुरुषांबरोबरीचे अधिकार बहाल करणे ही काळाची गरज आहे. मग ते सामाजिक असोत की, आर्थिक असोत. यात तीला सक्षम करून तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. तर समाजात समानता प्रस्थापित होईल. लिंगभेद हा समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी खुप मोठा अडथळा आहे. असे मौलिक विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ स्मिता खरकाटे साफ्टवेअर अभियंता पुणे ह्या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे सौ शालिनी खरकाटे सहा. प्राध्यापक संगणक विभाग शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रम्हपुरी., प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे, मेजर विनोद नरड, डॉ डांगे, डॉ दर्शना उराडे व सौ संगिता ठाकरे, होते.
या प्रसंगी सौ स्मिता खरकाटे यांनी घरात व कार्यालयात महिलांना अधिकार बहाल करण्याची गरज आहे. आज महिला संगणक युगात पुरूषांच्या बरोबरीने काम करते पण तीला समजून घेता आले पाहिजे. असे मौलिक विचार व्यक्त केले. तर दुसऱ्या मार्गदर्शक सौ शालिनी खरकाटे यांनी. महिलांनी आता आपल्या हक्क व अधिकारासाठी पुढे येण्याची गरज आहे असे मत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ उराडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा रंगारी व आभार प्रा मनिषा लेनगुरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ प्रकाश वट्टी रासेयो कार्यक्रमाधिकारी यांनी केले.
तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गर्ल्स वेल्फेअर समीतीने डॉ के के गील, प्रियंका उईके, शिरीन खान , सौ ओजस्विनी बावणकुळे व महिला अध्ययन सेवा केंद्राचे प्रभारी प्राध्यापक डॉ अजित खाजगीवाले, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ विवेक नागभिडकर, प्रा. अभिमन्यू पवार तसेच रासेयो स्वयंसेवक गोपाल करंबे, सुरज के. मेश्राम, विक्रम मानकर, भैरवी राऊत, श्रुती करंडे, गायत्री मदनकर, संध्या बगमारे, अंबिका मांढरे, समीक्षा पंडीत,पुजा बगमारे ,गणेश धंजूळे,रूचिता येलमुले, मयुरी ठेंगरी, राणी गेटकर, रोहित सहारे,सौरभ तलमले, व महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




