Home महाराष्ट्र 20 हजार महिलांना मिळणार अंगणवाडीत नोकऱ्या-३१ मे पर्यंत कालबद्ध भरती- Anga wadi...

20 हजार महिलांना मिळणार अंगणवाडीत नोकऱ्या-३१ मे पर्यंत कालबद्ध भरती- Anga wadi Bharti 2023

162

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.11मार्च):-नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही तेथे नवीन अंगणवाडी उघडली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २० हजार ६०१ जुनी रिक्त पदे भरली जाणार आहेत.

तसेच नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ या केंद्र पुरस्कृत योजनेतून महाराष्ट्रात अंगणवाड्या चालविल्या जातात. त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणताना या सर्व अंगणवाड्या अपडेट करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच २०१७ पासून रिक्त असलेली २० हजार पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. येत्या ३१ मे पूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.

महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजुरी – महाराष्ट्रात ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका तर १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस अशी २ लाख ७ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. नोव्हेंबर २०२२ च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची ४ हजार ५०९, मिनी अंगणवाडी सेविकांची ६२६ आणि अंगणवाडी मदतनीसांची १५ हजार ४६६ अशी एकूण २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. ती ३१ मेपर्यंत भरण्याचे निर्देश आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here