Home बीड महाएनजीओ फेडरेशन पुणे चा राजमाता जिजाऊ पुरस्कार सौ आशाताई बाजीराव ढाकणे यांना...

महाएनजीओ फेडरेशन पुणे चा राजमाता जिजाऊ पुरस्कार सौ आशाताई बाजीराव ढाकणे यांना जाहीर

173

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.10मार्च):- महाएनजीओ फेडरेशन पुणे चा महिला सक्षमीकरण व मुलींच्या जन्माचे स्वागत या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार बीड जिल्ह्यातील मौजे जोला पो देवगाव ता केज येथील श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका सौ.आशाताई बाजीराव ढाकणे, बीड यांना महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक आदरणीय शेखरभाऊ मुंदडा यांनी महिला सक्षमीकरण व मुलींच्या जन्माचे स्वागत या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर केला आहे.तो येत्या रविवारी पुणे येथील शिवाजी नगर भागातील माहेश्वरी शिक्षण समूहाच्या परिसरात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात वितरित करण्यात येणार आहे.

महा एनजीओ फेडरेशनद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त || महिला सक्षमीकरण व मुलींच्या जन्माचे स्वागत आणि वंचित बालके || या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्कार सौ. आशाताई बाजीराव ढाकणे यांना जाहीर झाला असून १२ मार्च २०२३ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

सौ. आशाताई ढाकणे यांनी बीड जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत हा मागिल पाच वर्षांपासून उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत महाएनजीओ फेडरेशन व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज जि बीड यांच्या माध्यमातून बीड परिसरातील अनेक ठिकाणी बालविवाह प्रतिबंधक कायदा यासंदर्भात बैठका घेऊन लोकांना जागृत केले आहे.

त्यांनी शालेय विद्यार्थी व महिलांच्या आरोग्यसाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते हे लोकांच्या लक्षात आणून दिले आहे. जोला व पिंपळगाव ता केज येथील नदीचे खोलीकरण करून दोन्ही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविली आहेत. लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले आहे तसेच परिसरातील पडिक जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र विडा येथील परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. शहरी तथा ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांनी महिलांच्या संदर्भातील कायद्यांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.

त्यामुळे महिलांच्या बाबतीत ही एक संजीवनी ठरली आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा समाजात विशेष योगदान देणाऱ्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो. महिला सक्षमीकरण व मुलींच्या जन्माचे स्वागत आणि वंचित बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न हा उपक्रम येत्या काळात देशासाठी विशेष भूमिका बजावेल असे मत महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक आदरणीय शेखरभाऊ मुंदडा यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here