✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.10मार्च):- सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानी शाळेच्या सहा.शिक्षिका आशा राजूरकर मॅडम यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून पालक प्रतिनिधी विजया मेश्राम,शाळेच्या सहा.शिक्षिका किरण वाडिकर मॅडम,भावना राऊत मॅडम,पूजा वीर मॅडम,श्रद्धा वाढई मॅडम यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या नंतर महिला दिनावर आधारित पूजा वीर मॅडम यांनी गीत गायन केले . याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या कु. मितन विलास मेश्राम वर्ग 6 वा व तिच्या आईचे शाळेच्या वतीने पुस्तके व भारताचे संविधान भेट देत सत्कार करण्यात आला.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या सौ. किरण गजपुरे मॅडम व कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा राजुरकर मॅडम यांनी महिला दिनावर आधारीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर सर यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे सर,सहा.शिक्षक आशिष गोंडाने सर, सतीश जिवतोडे सर यांची उपस्थिती होती.




