🔹एक टाईमच्या जेवणाचा प्रश्न निर्माण
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.5मार्च):-सायंकाळी सहा वाजता स्वयंपाक करून रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबातील तीन व्यक्ती घराबाहेर झोपले असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन घराला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. घरातील संसार उपयोगी साहित्य जळाली असल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. हालाकिची परिस्थिती त्यातच गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबासमोर सायंकाळी जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तीने या कुटुंबाला मदतीचा हात देणे गरजेचे बनले आहे.
गंगाखेड तालुक्यातील पोखर्णी वाळके शिवारात आशाबाई गोरखनाथ गुरव या पायाने अपंग असलेली महिला आपल्या दोन वृद्ध नातेवाईकांसह पोखर्णी वाळके शिवारात वास्तव्यात आहे या ठिकाणी असलेल्या दीड एकर शेतामध्ये आणि गावात भिक्षा मागून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात मात्र त्या नेहमीप्रमाणे शुक्रवार ३ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता स्वयंपाक करून नेमके त्याच दिवशी गर्मी होत असल्याने घराबाहेर बाजेवर येवून झोपले असताना रात्री साडेनऊ वाजता सुमारास घराला अचानक आग लागली या आगीमध्ये घरात ठेवलेला कापूस,तुर, संसार उपयोगी साहित्य शेतासाठी आणलेला खत संपूर्ण जळून खाक झाले आहे. तर आशाबाई गरुड यांच्या पतीला दारूचा व्यसन असल्यामुळे पती पासून वाचून ठेवलेले पंधरा ते वीस हजार रुपये जळून खाक झाले आहेत या आगीमुळे आशाबाई गुरव यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे आता सायंकाळचे जेवण कसे करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
आगीची माहिती मिळतात ग्रामपंचायत सदस्य विजय गाडोदे यांनी गुरव यांच्या घराला भेट देऊन त्यांना मदतीचा हात देत पाच हजार रुपये आर्थिक मदत केली आहे. यासोबतच सुंदर राकेले, हनुमान सिसोदे, मानसिंग सिसोदे ,बंडू नाना यांनी संसार उपयोगी साहित्य दिले आसपास नागरिकांनी आपापल्या परीने मदत करित आहे. मात्र असे असले तरी या आगीमध्ये गुरव कुटुंबाचा आक्का संसार उघड्यावर आला असल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी गुरव कुटुंबाच्या मदतीला धावून येणे गरजेचे बनले आहे.




